मुरलीधर मोहोळांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी!

Muralidhar Mohol : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना पुण्याचे उमेदवार म्हणून पाहिले जाते.
Muralidhar Mohol
Muralidhar MoholSarkarnama

पुणे : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची थेट भारतीय जनता पक्षाच्या (Bhartiya Janata Party) महाराष्ट्र प्रदेश सरचिणीसपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिणीसपदी त्यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. मोहोळ यांच्यासोबतच अॅड. माधवी नाईक, विक्रांत पाटील, रणधीर सावरकर, संजय केणेकर यांचीही महाराष्ट्र प्रदेश सरचिणीसपदी निवड करण्यात आली आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या या अचानक झालेल्या नियुक्तीमुळे पुणे भाजपमध्ये आता एकच चर्चा होत आहे. पुण्यातील राजकारणात भाजपाचे महत्वाचे नेतृत्व असलेल्या मोहोळ यांच्याकडे राज्य पातळीवरील जबाबदारी देण्यात आल्यामुळे, पक्षात चर्चा सुरू झाली आहे. तर्क -वितर्कांना उधान आले आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच मोहोळ यांच्याकडे केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती करण्यात आली होती.

Muralidhar Mohol
केंद्रीय मंत्री रेणुका सिंहांच्या दाव्याने आढळराव पाटलांची धाकधूक वाढली

मोहोळ यांच्यावर पक्षाच्या राज्यपातळीवरची महत्त्वाची जबाबदारी दिल्याने पक्षाच्या केंद्रीय नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क वाढत जाणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत २०१७ साली भाजपाची सत्ता आल्यानंतर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर महापौर झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना पुण्याचे उमेदवार म्हणून पाहिले जाते. भाजपसह इतरही अनेक पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणून ते ओळखले जातात. कोरोना आणि लॉकडाऊन काळात महापौर म्हणून मोहोळ यांनी पेललेली जबबादारी आणि शहराच्या प्रश्नांचे अभ्यासू नेते यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com