मुरलीधर मोहोळ राज्याच्या राजकारणात ? : नव्या नियुक्तीमुळे तर्क-वितर्कांना उधाण

Muralidhar Mohol : मोहोळ यांच्या नियुक्तीने पुणे भाजपमध्ये आश्‍यर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Muralidhar Mohol
Muralidhar MoholSarkarnama

पुणे : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची भाऱतीय जनता पक्षाच्या (Bhartiya Janata Party) केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहोळ यांच्या या अचानक नियुक्तीने पुणे भाजपमध्ये आश्‍यर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील राजकारणात भाजपाचे महत्वाचे नेतृत्व असलेल्या मोहोळ यांच्याकडे नेत्यांचे दौरे आणि सभांचे नियोजन सोपविणे, यामुळे पक्षाच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पक्षाने दिलेली जबबादारी स्वीकारून आपण ती पार पाडणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

Muralidhar Mohol
अमित शहा - राज ठाकरे भेटीची शक्यता : भाजप मनसे युतीचे संकेत

भाजपच्या संघटनात्मक रचनेमध्ये वेगवेगळ्या समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये केंद्रीय नेत्यांचा राज्यातील दौरा, त्यांच्या सभांचे तयारी आणि नियोजन करण्यासाठी केंद्रीय नेता प्रवास समिती आहे. याच समितीच्या पश्चिम महाराष्ट्रासाठीच्या सहसंयोजकपद व त्याची जबबादारी माजी महापौर मोहोळ यांच्याकडे सोपवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहोळ यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

Muralidhar Mohol
पुणे महापालिकेचे विभाजन करा :चंद्रकांतदादांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले

मोहोळ यांच्यावर नेत्यांच्या दौऱ्यांची जबाबदारी दिल्याने आता त्यांच्या नावाचा विचार पुणे लोकसभा निवडणुकीसाठी होणार नाही, अशी पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर याउलट मोहोळ यांना पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मिळाली असल्यामुळे, पक्षाच्या केंद्रिय नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क वाढत जाणार आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी फायदेशीरच ठरेल, असेही बोलले जात आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना पुण्याचे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. भाजपसह इतरही अनेक पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणून ते ओळखले जातात. कोरोना आणि लॉकडाऊन काळात महापौर म्हणून मोहोळ यांनी पेललेली जबबादारी आणि शहराच्या प्रश्नांचे अभ्यासू नेते यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in