पिंपरी-चिंचवडच्या `पुष्पा`ला पालिका प्रशासक पाटलांनी दाखवला हिसका

PCMC|Rajesh Patil : उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करीत आहेत, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
Rajesh Patil & PCMC Latest News
Rajesh Patil & PCMC Latest NewsSarkarnama

पिंपरी : झाड सोडा, त्याची फांदीही विनापरवाना छाटता येत नाही. तरीही उद्योगनगरीतील आकुर्डीतील फॉर्मायका कंपनीने आपल्या आवारातील एक नाही, तर तब्बल ९० झाडे बेकायेदशीरपणे कापलीच नाही, तर ती जेसीबीने मुळासकट गेल्या आठवड्यात उखडूनच टाकली. त्याबाबत अपना वतन संघटनेने तक्रार करताच पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) या कंपनीला ४५ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. तसेच या कंपनीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. (Rajesh Patil & PCMC Latest News)

Rajesh Patil & PCMC Latest News
पावसाचा कहर : पुणे, पिंपरी-चिंचवड अ्न नवी मुंबईतील शाळांना उद्या सुटी; आदेश जारी...

दरम्यान, प्रत्यक्षात काही शेकडो झाडे तोडली असल्याचा संशय याबाबत पालिका आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रार केलेल्या अपना वतनचे कार्याध्यक्ष हमीद शेख यांनी यासंदर्भात सांगितले. त्यांनी ७ तारखेला दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाने आज केली. या तक्रारीत सागवान, लिंब, बाभूळ, वड, पिंपळ अशा विविध प्रजातीच्या काही शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच पालिकेच्या काही अधिकाऱ्यांचे हातही या अवैध वृक्षतोडीत ओले केल्याचा दावा करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती झालेली नाही. तसेच ती होण्याचीही शक्यता दिसत नाही. उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करीत आहेत, असे अपना वतनचे संस्थापक अध्यक्ष सिद्दीक शेख यांचे म्हणणे आहे.

Rajesh Patil & PCMC Latest News
गंभीर गुन्ह्याचा तपास सोडून पिंपरी पोलिसांचे लक्ष दारु अन् गुटख्यावर

ही झाडे तोडल्यानंतर त्याचा पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. झाडे मूळासकट उखडलेली जागा जेसीबीनेच उकरून तिचे सपाटीकरण नंतर करण्यात आले होते. तीस-चाळीस कामगारांनी तोडलेली झाडे दहा-बारा ट्रकमधून नेली. या वाहनांवर पिंपरी-चिंचवड महापालिका असे लिहिले होते, असा आरोप सिद्दीक शेख यांनी केला आहे. दरम्यान, फॉर्मायका कंपनीला एक झाडामागे पन्नास हजार अशारितीने ९० झाडांची विनापरवाना कत्तल केल्याबद्दल ४५ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली असल्याचे पिंपरी पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. या कंपनीचा खुलासा समाधानकारक वाटला नाही, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला जाईल, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com