Pune University Kulguru News: मुंबई-पुणे विद्यापीठ कुलगुरूपदासाठी मुलाखती झाल्या; पण नेमणुका रखडल्याने नव्या चर्चांना उधाण

Pune University सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे.
Dr. Parag Kalkar| Dr. Avinash Kumhar| Dr. Sanjay Dhole|  Dr. Suresh Gosavi| Dr. Vijay Phulari
Dr. Parag Kalkar| Dr. Avinash Kumhar| Dr. Sanjay Dhole| Dr. Suresh Gosavi| Dr. Vijay PhulariSarkarnama

SavitriBai Phule Pune University Kulguru News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. गेल्या शुक्रवारी डॉ. पराग काळकर, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. संजय ढोले. डॉ. सुरेश गोसावी व डॉ. विजय फुलारी या पाच जणांच्या अंतीम मुलाखती कुलपती रमेश बैस यांनी घेतल्या. पुण्याबरोबरच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीदेखील पाच जणांच्या मुलाखती याच दिवशी झाल्या आहेत. मात्र, मुंबई विद्यापीठाची निवडदेखील रखडली आहे. (Mumbai-Pune University Interviews held for Vice-Chancellorship; But why did the appointments stop)

Dr. Parag Kalkar| Dr. Avinash Kumhar| Dr. Sanjay Dhole|  Dr. Suresh Gosavi| Dr. Vijay Phulari
Savitribai Phule Pune University : 'या' पाच जणांमधून कोण होणार पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू?

वास्तविक ज्या दिवशी मुलाखती झाल्या त्याच दिवशी नव्या कुलगुरूंची निवड होणे अपेक्षित होते. मात्र, चार दिवस उलटले तरी अद्याप निर्णय झालेला नाही. ज्या दिवशी कुलगुरूपदासाठी कुलपतींकडे अंतीम मुलाखती होतात. त्याच दिवशी सायंकाळी निवड जाहीर होते ही आजपर्यंतची परंपरा आहे. मात्र, या परंपरेला खीळ बसली आहे.अंतीम मुलाखती झाल्यानंतरदेखील निवड जाहीर का होत नाही याचीच चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात विद्यापीठातील विविध विभागांमध्ये आणि विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या ११ उमेदवारांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला होता. या उमेदवारांमध्ये कुलगुरूपदासाठी चुरस होती. त्यातील चार उमेदवारांची अंतीम मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. तर एक कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापिठाचे भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी  हे पाचवे उमेदवारही होते.

Dr. Parag Kalkar| Dr. Avinash Kumhar| Dr. Sanjay Dhole|  Dr. Suresh Gosavi| Dr. Vijay Phulari
Balu Dhanorkar News : कारकीर्द ऐन भरात असताना घेतलेली एक्झीट चटका लावून गेली !

याच काळात विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी शुक्रवारी (१९ मे ) पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी सुध्दा मुलाखत दिली आहे. पण त्यापूर्वीच सोनवणे यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली होती.(Latest Marathi News) पण अद्यापही या पाच जणांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आता याची चर्चा सुरू झाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in