शंभर जागा जिंकून फडणविसांना वाढदिवसाची भेट देण्याचा मुळीकांचा निर्धार !

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत (PMC) ऐतिहासिक यश मिळाले होते.
Jagdish Mulik
Jagdish MulikSarkarnama

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहर कार्यालयात आज केक कापून फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.येत्या निवडणुकीत पुणे महापालिकेत १०० जागा जिंकून उपमुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाची भेट देण्याचा निर्धार शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी यावेळी केला.

Jagdish Mulik
भाजपचे नेते धैयशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल ; रिव्हालव्हरने धमकावल्याचा आरोप

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले होते. तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्षाची मुदत संपल्यानंतर सध्या महापालिकेत प्रशासकांचे राज्य आहे.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने महापालिकेत सत्ता येण्यास भाजपाला अडचण होती. राज्यात पुन्हा सत्ताबदल झाल्यानंतर भाजपात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळेच पुन्हा शंभर जागा निवडून आणण्याचा निर्धार पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.

Jagdish Mulik
शिवसेना आमचं 'रक्त' आहे : दीपक केसरकरांनी सांगितली दोन उदाहरण

महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कंबर कसली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. काहीही करून पुण्याचे सत्ता काबीज करायचीच असा, चंग राष्ट्रवादीने बांधला होता. त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्याचाच प्रत्येक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आला. शहर कार्यालयात फडणवीस यांच्या वाढदिवसाचा केक कापून महापालिकेत पुन्हा शंभर जागा निवडून आणायचा निर्धार शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in