MPSC Students Protest in Pune : परीक्षा पद्धतीतील नव्या बदलांबाबत विद्यार्थी आक्रमक; सरकार दखल घेणार का?

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी आज (१३ जानेवारी) रस्त्यावर उतरले आहेत.
MPSC Students Protest in Pune
MPSC Students Protest in Pune

MPSC Students Protest in Pune : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Examination) परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी आज (१३ जानेवारी) रस्त्यावर उतरले आहेत. आयोगाने गेल्या वर्षी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत केलेला बदल २०२५ पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुण्यातील अलका चौकात युवक कॉंग्रेसच्या (Congress) नेतृत्त्वात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी याठिकाणी जमले आहेत. पण आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याचे दिसत आहे. गेल्या वेळच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

MPSC Students Protest in Pune
Accident News: साईभक्तांवर काळाचा घाला! सिन्नर व शिर्डी महामार्गावर भीषण अपघात,१० भाविकांचा दुर्दैवी अंत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गेल्या वर्षी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. २०२३ पासून एमपीएससीच्या परीक्षाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहेत.

पण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदलाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर तो एमपीएससीवरील दबाव समजून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयोगाकडून देण्यात आला होता. या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल २०२५ पासून लागू करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राज्यभरातील विद्यार्थी पुण्यात मोठमोठी स्वप्ने उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. चार-चार वर्षे घरापासून दूर राहुन तासनतास अभ्यास करुन ते जिद्दीने परीक्षा देत असतात. पण २०१९ मध्ये आलेल्या कोरोना महामारीने सर्व जगाचे ठप्प झाले. महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, क्लासेस झाले नाही, मानसिक किंवा शारिरीक अडचणींमुळे अभ्यासावरही परिणाम झाला.

पण याही संकटातून मार्ग काढून विद्यार्थी पुन्हा एकद जोमाने अभ्यासाला लागले. त्यात आयोगाने एमपीएससी परीक्षेसाठी नियम किंवा पॅटर्न बदलल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे आयोगाच्या या निर्णयावर आक्रमक होत एमपीएससीच्या विद्यार्थी आज पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in