MPSC विद्यार्थ्यांनी यासाठी मानले शरद पवारांचे आभार..

MPSC Students Meet Sharad Pawar : ३० मार्च रोजी शरद पवार स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

MPSC Students Meet Sharad Pawar : एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नविरोधात आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने मान्य केल्या आहेत. याप्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळाला यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढाकार घेतला होता.

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनाला बसलेल्या एमपीएससी परीक्षार्थींची शरद पवार यांनी भेट घेतली होती. शरद पवार रात्री ११ वाजता पुण्यातील आंदोलनस्थळी गेले. विद्यार्थ्यांच्या व्यथा-वेदना जाणून घेतल्या.

Sharad Pawar
Pune News : शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही..; वळसे पाटलांनी स्पष्ट सांगितलं..

आंदोलनस्थळावरुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन या प्रकरणी तातडीने लक्ष घालावी, अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीही एमपीएससी आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर एमपीएससीने ट्विट करुन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला होता.

आज (रविवारी) एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळाने पुण्यात बारामती होस्टेल येथे शरद पवार यांची भेट घेतली.राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न २०२५ पासून आयोगाने लागू केल्यानंतर शरद पवार यांचे आभार मानले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात देखील चर्चा झाली. ३० मार्च रोजी शरद पवार स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून ? ; दोघेही उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहताहेत..

काही दिवसापूर्वी एमपीएससीच्या परीक्षार्थींनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली होती. परीक्षार्थींच्या आंदोलनाला-मागण्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पवारांचे आभार मानले.

"आपण रात्री ११ वाजता आम्हाला भेटलात. या वयातही आपण तब्बल ४० मिनिटे उभे होतात. आमच्या व्यथा जाणून घेतल्या. इतर पुढारी पुण्यातील कसब्यात प्रचाराला आले अन् तिथून आमच्याकडे आले. आपण एकमेव होतात ज्यांनी फक्त आमच्यासाठी वेळ दिलात. आपले खरोखर आभार...", अशा भावना परीक्षार्थींनी व्यक्त केल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com