MPSC : मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी ‘सीसॅट’च्या पेपर दोनमध्ये ३३ टक्के गुण बंधनकारक

लोकसेवा आयोगाच्या या पुढच्या पूर्व परीक्षेपासून हा नियम बंधनकारक करण्यात येणार आहे.
MPSC
MPSC Sarkarnama

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर क्रमांक दोनमध्ये (सीसॅट) ३३ टक्के गुण मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘सीसॅट’च्या या पेपरमध्ये ३३ टक्के गुण मिळाले तरच मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येणार आहे.

MPSC
टिळकांनी एकही वीट रायगडावर नेला नव्हती; चुकीचा इतिहास सांगू नका

सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एकमधील गुण मुख्य परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. मात्र, या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेच्या पात्र यादीत समाविष्ट होण्यासाठी पेपर क्रमांक दोन (सीसॅट) मध्ये किमान ३३ टक्के गुणांची अट बंधनकार करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाच्यावतीने पसिद्धीपत्रक काढून या संदर्भातील घोषणा केली आहे.

MPSC
अस्मितांवर घाला घालणाऱ्या राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारणार नाही : राजेंद्र पवारांच्या भूमिकेने खळबळ!

लोकसेवा आयोगाच्या या पुढच्या पूर्व परीक्षेपासून हा नियम बंधनकारक करण्यात येणार आहे. लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा महत्वाच्या मानल्या जातात. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. उपजिल्हाधिकारी, उविभागीय पोलीस आधिकारी, जिल्हा परिषदेचे उममुख्य कार्यकारी आधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तहसिलदार यासारख्या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभाराबद्दल परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच नाराजीची भावना असते. परीक्षांचे नियोजनातील गोंधळ हे या नाराजीचे मुख्य कारण मानले जाते. आयोगाच्या कारभारविरूद्ध कोरोना काळातदेखील विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. काही विद्यार्थ्यांनी नैराश्‍येतून आत्महत्यादेखील केल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही महिन्यात आयोगाने आपल्या कामात अमूलाग्र बदल केल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यसेवा परीक्षाचे अंतीम निकाल आयोगाने जाहीर केला. वेळापत्रकानुसार शेवटच्या दिवशीच्या मुलाखती संपल्यानंतर अवघ्या दोन तासात निकाल जाहीर करून आयोगाने साऱ्यांनाच चकित केले होते.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com