एमपीएससी परीक्षा : मंत्री वडेट्टीवार आता तरी जागे होणार का ?  - MPSC exam: Will Minister Vadettiwar wake up now? | Politics Marathi News - Sarkarnama

एमपीएससी परीक्षा : मंत्री वडेट्टीवार आता तरी जागे होणार का ? 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 जुलै 2021

राज्यातून सव्वाचार लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याची मागणी राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांकडून होत आहे. मात्र, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्याशिवाय आयोगाला परीक्षेची तारीख जाहीर करता येत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा कार्यभार पाहणारे मंत्री विजय वडेट्टीवार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी घोषणाबाजी करीत आहेत. मात्र, आयोगाला पत्र देण्याची कार्यवाही त्यांच्या खात्याकडून होत नसल्याने स्वप्नील लोणकरसारख्या तरूणांचे बळी जात आहेत. या घटनेनंतर तरी मंत्री वडेट्टीवार जागे होणार का असा प्रश्‍न विद्यार्थी विचारू लागले आहेत.(MPSC exam: Will Minister Vadettiwar wake up now?) 

मार्च २०२० पासून कोरोनाच्या संकटामुळे य परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. संयुक्त पूर्व परीक्षा पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), विक्री कर निरीक्षक (एसटीआय) व कक्षाधिकारी (एएसओ) या तीन पदांसाठी घेण्यात येते. या परीक्षेला सुमारे सव्वाचार लाख विद्यार्थ्यांनी राज्यभरातून नोंदणी केली आहे.राज्यात आणि देशात नीटची परीक्षा घेण्यात आहे. केंद्रीय लोगसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुलाखती वेळेत होत आहेत.मात्र, गेल्या सोळा महिन्यांपासून या परीक्षा घेण्याची तयारी राज्य सरकारकडून होत नाही. या संदर्भात महाराष्ट्र लोकासेवा आयोगाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही अडचण नसलयाचे सांगण्यात आले. केवळ राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्तापन विभागाने परीक्षा घेण्याची परवानगी दिल्यास परीक्षेचे नियोजन तातढीके करणे शक्य होणार असल्याचे आयोगाच्यावतीने सांगण्यात येत आहे. या विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे हा विषय खूपवेळा मांडण्यात आला. मात्र. त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. परीक्षांना होणारी दिरंगाई टाळून विद्यार्थ्यांमधील अस्वस्था व असंतोष कमी करण्यासाठी मंत्री वडेट्टीवार आता तरी जागे होणार का असा प्रश्‍न विद्यार्थीच विचारू लागले आहेत.   

राज्यातून सव्वाचार लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या सोळा महिन्यात परीक्षाच न झाल्याने यातील अनेकांची पात्रतेचे वय संपून गेले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वयाची सवलत देण्याची घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही. कोरोनामुळे परीक्षा झाल्या नाहीत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार नाही. वयाची अट शिथील करून विद्यार्थ्यांना एका वर्षाची संधी देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र, पुढे काहीही झालेले नााही.राज्य सरकार स्पर्धा परीक्षा व या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न याकडे फारशा गांभीर्याने पाहात नाही, असे गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून स्पेट होत आहे.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख