खासदार उदयनराजेंच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाची चर्चा

खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील प्रवेशाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
sar14.jpg
sar14.jpg

पुणे : खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील प्रवेशाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. मात्र, माझे मंत्रीमंडळ मी स्वत: निवडतो. मला कुणी मंत्री करू शकत नाही. माझे सारे मित्र हेच माझे मंत्रीमंडळ आणि कॅबिनेट असल्याची प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे. खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली असली तरी मंत्रीमंडळातील त्यांच्या समावेशाबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे.या विस्तारात महाराष्ट्रातील काही जणांचा समावेश होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत असून त्यात छत्रपती खासदार उदयनराजे यांचे नाव असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने पश्‍चिम महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या महत्वाचा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरदेखील छत्रपती उदयनराजे यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांआधी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंह यांचा भाजपात प्रवेश करून घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाने सत्ता गमावली. त्यामुळे राज्यातील पक्ष संघटनेत काही प्रमाणात अस्वस्थता आहे. त्यातही आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या मंत्री मंडळातील समावेशाच्या चर्चेला विशेष महत्व आहे.


लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनदेखील खासदार उदयनराजे यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आले. या माध्यमातून आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रात पाया भक्कम करण्यासाठी खासदार उदयनराजे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com