Udayanraje Bhosale : कोश्यारी, त्रिवेंदींना लाज वाटत नाही का ? ; उदयनराजे भडकले

Udayanraje Bhonsle : त्यांच्या या विधानाला काय आधार आहे.
Udayanraje bhosale
Udayanraje bhosaleSarkarnama

Udayanraje Bhonsle : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर खासदार उदयनराजे भडकले, ते माध्यमांशी बोलत होते. शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उदयनराजे म्हणाले, "शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले आहेत, असे राज्यपालांचे विधान ऐकल्यावर मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या या विधानाला काय आधार आहे. अनेक राजे मुगलांना शरण गेले, पण शिवाजी महाराजांनी विरोध केला, जनतेला सन्मान मिळून देण्यासाठी त्यांनी लढाया केल्या. साम्राज्य वाढविण्यासाठी नव्हे तर त्यांनी सामान्यांसाठी लढाई केली,"

"छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही, त्यांच्या विचारावर हा देश अखंड राहू शकतो.नाहीतर देशाचे तुकडं होतील. शिवाजी महाराजांनी त्यांचे कुटुंब मानले नाही तर देशाला त्यांनी कुटुंब मानलं आहे. शिवाजी महाराजांनी लोकशाहीची संकल्पना मांडली. शिवाजी महाराजांनी नेहमी रयतेचं राज्य मानलं. त्यांनी स्वतःचे राज्य कधीच मानले नाही. त्यांनी कधीही मीपणाला थारा दिला नाही," असे उदयनराजे म्हणाले.

Udayanraje bhosale
Basavaraj Bommai : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले ; सोलापूर आणि अक्कलकोटवर केला दावा

"शिवरायांची विचारधारा सोडून चालणार नाही. त्यांनी रयतेचे राज्य उभं केले. कोश्यारींच्या व्यक्तव्यामुळे चीड येते. आता व्यक्तीकेंद्री झाले आहेत. त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे," असे ते म्हणाले.

सुधांश्री त्रिवेदी यांनी कोणत्या आधारे शिवाजी महाराज यांच्याबाबत विधान केलं, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का, त्यांना लाज वाटत नाही, शिवाजी महाराजांनी माफीनामा लिहून दिला याला पुरावा काय आहे, असा सवाल त्यांनी विचारला.

पवार, गडकरींनी आक्षेप का घेतला नाही?

राज्यपालांनी हे विधान केले तेव्हा येथे व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आक्षेप का घेतला नाही, असा सवाल उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला. कोश्यारी यांच्या विधानानंतर आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला का, या प्रश्नाला उत्तर देणं त्यांनी टाळलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com