वाईनची पॉलिसी मी वाचलेली नाही : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या देहूतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
Supriya Sule
Supriya Sulesarkarnama

पिंपरी : नवरनिर्मित देहू (ता. हवेली,जि. पुणे) नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने (ncp) नुकतेच घवघवीत यश प्राप्त केले. त्याबद्दल देहूकरांचे आभार मानण्यासाठी आणि नवनिर्वाचित नगरसदस्यांचे अभिनंदन करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या शनिवारी (ता.२९) देहूत आल्या होत्या.

Supriya Sule
दारु आणि वाईन यामध्ये जमीन अस्मानचा फरक; अजित पवार

यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी आपल्याकडे अनधिकृतपणे देत असल्याचा खळबळजनक जबाब राज्याचे माजी निवृत्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिला आहे. त्यावर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधिनीं प्रतिक्रिया विचारली असता 'ईडी'चा मला अॅक्सेस नाही. कुंटेंचा जबाबही वाचलेला नाही. त्या मुळे त्यावर मी कशी बोलणार, असे त्या म्हणाल्या. त्यावर ईडीचा पूर्ण अॅक्सेस असल्यासारखे व त्यांच्या प्रवक्त्याच्या थाटात वरचेवर स्टेटमेंट देणाऱ्या भाजपच्या एका माजी खासदाराला, तर हा टोला त्यांनी लगावला नाही ना अशी चर्चा ऐकायला मिळाली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधाना संदर्भातही त्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना ही कॉंग्रेसला खाऊन टाकणार हे पाटील यांचे विधान असल्याने त्यावर मी कसे बोलणार, असे त्या म्हणाल्या. ते विधान माझे असते, तर मी बोलले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. सुपर मार्केटसह किराणा दुकानातून वाईन विक्री परवानगी देण्याच्या राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयावर त्या म्हणाल्या, हा निर्णय तथा पॉलिसी मी वाचलेली नाही. म्हणून त्याचा अभ्यास नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule
बारामतीत फौजदाराच्या करामतींची चर्चा; तक्रारदारालाच हातपाय तोडण्याची धमकी

राष्ट्रवादीच्या देहूतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आणि संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी खास आल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या देहू जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. देहूकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी मनापासून त्यांचे आभार मानले. देहूच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यापर्यंत पाठपुरावा करण्याचा शब्द त्यांनी दिला. यावेळी त्यांनी तुकोबारायांची गाथा व प्रसाद देहूतील मंदिराबाहेरून विकत घेतला. स्थानिक आमदार मावळचे सुनीलअण्णा शेळके व पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com