सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्यामुळे दौंडकरांचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटला

दौंड रेल्वे स्थानक (Daund railway station) आता पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात आले आहे.
सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्यामुळे दौंडकरांचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटला
Daund railway stationsarkarnama

पुणे : दौंड रेल्वे स्थानक (Daund railway station) सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे (mp Supriya Sule) यांनी या विषयाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या निर्णयानंतर सुळे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट घेऊन सुप्रिया सुळे या रेल्वेमंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा करीत होत्या.

प्रवाशांची संख्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे कसे गैरसोयीचे होते, याबाबत वेळोवेळी त्यांनी नकाशासहित लक्षात आणून दिले होते. लोकसभेतही त्यांनी अनेक वेळा हा विषय उपस्थित करून सरकारच्या लक्षात आणून दिले होते. दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे सुळे त्यांनी सांगितले होते.

Daund railway station
भारतीयांनी वर्षभरात काय सर्च केलं?

दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे हा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटणे सोपे होणार आहे.

दौंड रेल्वे स्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. याठिकाणी येणाऱ्या अडचणी किंवा काही अनुषंगिक कामे करण्यासाठी पुण्यातील अधिकाऱ्यांना वेळेत पोहोचणे शक्य होते. त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी सुळे या सातत्याने सरकारकडे करीत होत्या. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. दौंड रेल्वे स्थानक (Daund railway station) आता पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात आले आहे.

अशी असेल नवी रचना

  1. रेल्वेच्या पुणे विभागात सध्या ५३१.१५ रेल्वेकिलोमीटर इतका रेल्वेमार्ग आहे. त्यात आता वाढ होऊन ७३९.४२ रेल्वेकिलोमीटर इतका होईल.

  2. सोलापूर विभागाचे ९८१.५३ रेल्वे किलोमीटरचे ७७३.३६ रेल्वेकिलोमीटर इतके होतील.

  3. पुणे विभागात आतापर्यंत ७० रेल्वेस्थानकांचा समावेश होता. त्यात २४ची भर पडून आता एकूण ९४ स्थानके होणार आहे.

  4. सोलापूर विभागातील ८५ स्थानकांची संख्या ६१ इतकी होईल, असे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

  5. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या पुणे हे महाराष्ट्रातील महत्वाचे केंद्र असून कोल्हापूर, सांगली, नाशिक, नगर आणि सोलापूर या शहरांसाठी ते मध्यवर्ती ठरते.

  6. रेल्वेने उत्तर भारताला जोडणारे दौंड स्थानक पुण्याला जोडणे आवश्यक असल्याचे निरीक्षण रेल्वे मंत्रालयाने नोंदवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.