बाळासाहेबांच्या खाल्ल्या मिठाला तरी जागा, महाराष्ट्राची बदनामी करु नका ; सुळेंनी सुनावलं

''तुम्हाला भाषण करायचे आहे, तर तुम्ही जरूर करा पण आम्हाला काम करू द्या,''

Supriya Sule,Raj Thackeray
Supriya Sule,Raj Thackeraysarkarnama

पुणे : मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. तीन मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण सध्या तापलं आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ''महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही,'' असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्या इंदापूर येथे बोलत होत्या.


Supriya Sule,Raj Thackeray
मोदींना सुळे म्हणाल्या, 'इंदापूरला या, आम्ही तुम्हाला चार गोष्टी सुचवतो,'

''नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. हे मी सांगत नाही तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी कृपया दूर राहावं,'' असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता दिला.

''तुम्हाला भाषण करायचे आहे, तर तुम्ही जरूर करा पण आम्हाला काम करू द्या. भाषण करून तुमच्या माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही, आपली फक्त बदनामी होईल. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही,'' अशा शब्दात सुळेंनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. ''मराठी मराठी करता तर खरंच मराठीबाबात एवढं प्रेम असेल, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा. महाराष्ट्राची बदनामी करू नका,'' असा सबुरीचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना दिला.


Supriya Sule,Raj Thackeray
हरभजन सिंगच्या निर्णयाचं कौतुक : खासदारकीचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देणार

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर येथे केलेल्या कामांचे कौतुक सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या म्हणाल्या, ''दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राचं नव्हे तर देश घेईल, मी संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल.आदर्श शहर कसं असावं हे मी नरेंद्र मोदी यांना सांगेल की तुम्ही पण इंदापूर ला या ! आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो. इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे,''

दौंडचा विकास होत नसल्याची खंत सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. दौंडकडे विशेष लक्ष द्यावे, लागेल असे त्या म्हणाल्या. ''इंदापूर, बारामती आणि पुरंदरमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत परंतु दौंडचे आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे तर दौंडचा विकास रखडत नाही ना,'' असा सवाल सुळेंनी यावेळी उपस्थित केला. ''इंदापूर, बारामती आणि पुरंदरचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, दौंडचा विकास होत नाही. त्यामुळे दौंडकडे जास्त लक्ष द्यायला लागेल,'' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या महाआरतीनिमित्त पुण्यात मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करत पोस्टरबाजी केल्यानं चर्चा झाली होती. गुढीपाडव्यानिमित्त मुंबई आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in