शिंदे गटातील खासदाराने शिवसेनेतील बहिणीच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज!

एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेल्या या दोन्ही गटांतील दोन मोठ्या नेत्यांनी भाऊबीज साजरी केल्याने तो पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
Srirang Barne- Sulabha Ubale
Srirang Barne- Sulabha UbaleSarkarnama

पिंपरी : शिवसेनेतील (shivsena) फुटीनंतर ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गटांतील संघर्ष टोकाला गेलेला आहे, त्यातून एकमेकांवर खालच्या पातळीवरील टीका सध्या दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. अशा परिस्थितीतही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेल्या या दोन्ही गटांतील दोन मोठ्या नेत्यांनी भाऊबीज साजरी केल्याने तो पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad) चर्चेचा विषय झाला आहे. (MP Srirang Barne went to Shiv Sena leader Sulabha Ubale's house and celebrated bhaubeej)

शिंदे गटातील (बाळासाहेबांची शिवसेना) मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेच्या ((उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा संघटिका (शिरूर) सुलभा उबाळे यांच्या घरी जाऊन गुरुवारी (ता. २७ ऑक्टोबर) भाऊबीज साजरी केली. त्यांनी बहिणीला साडीही भेट दिली. भाऊबीजेच्या दिवशी कार्यबाहुल्यामुळे खासदार बारणे यांना वेळ मिळाला नाही. म्हणून ते मानलेल्या बहिणीच्या घरी गुरुवारी गेले आणि भाऊबीजेची ओवाळणी दिली.

Srirang Barne- Sulabha Ubale
क्रांतीसिंह नाना पाटील अन्‌ बबनराव ढाकणे हे परजिल्ह्यातील नेतेही बीडमधून लोकसभेत गेले!

खासदार बारणे हे थेरगाव, तर उबाळे या यमुनानगर, निगडी येथे राहतात. शिवसेनेच्या पिंपरी पालिकेतील गटनेत्या राहिलेल्या उबाळेंचा प्रभाग भोसरी विधानसभा मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिंदे गटात गेलेले शिरूरचे तीनवेळचे शिवसेनेचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या उबाळे या कट्टर समर्थक समजल्या जात होत्या. तर मावळचे खासदार बारणेंच्या त्या मानलेल्या बहीण आहेत. तरीही हे दोघे शिंदे गटात गेल्यानंतरही त्यांनी मूळ शिवसेनेतच राहणे पसंत केले आहे.

Srirang Barne- Sulabha Ubale
अभिजित पाटलांचा कल्याणराव काळेंना दणका; ‘चंद्रभागा’चे आजी-माजी संचालक लागले गळाला!

फायरब्रॅण्ड नेत्या अशी प्रतिमा असलेल्या सुलभा उबाळे यांना भाऊ आहे. तसेच खासदार बारणेंनाही बहिणी आहेत. तरीही त्यांनी एकमेकांना भाऊ-बहिण मानलेले आहे गेल्या २१ वर्षापूर्वी. तेव्हापासून अपवाद वगळता ते भाऊबीज आणि रक्षाबंधन नियमितपणे साजरी करीत आहेत. फुटीनंतर हे दोघे शिवसेनेच्या दोन वेगवेगळ्या गटात जाऊन एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले असले, तरी त्यांनी आपल्यातील भावाबहिणीचे नाते मात्र कायम ठेवले आहे. त्यामुळेच दोन्ही शिवसेनेतील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील दिवाळी गोडवा तथा भाऊबीजेची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in