खासदार बारणेंचे ते भाकीत खरे ठरले!

ही निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती.
Shrirang Barne
Shrirang BarneSarkarnama

पिंपरी : शिवसेनेचा राज्याबाहेर पहिला खासदार मंगळवारी (ता.२) दादरा-नगर-हवेलीत झाला. तेथून विद्यमान दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी शिवसेना उमेदवार कलाबेन या ५१ हजार नऊ मतांनी निवडून आल्या. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील या केंद्रशासित प्रदेशातून त्या निश्चित निवडून येणार असल्याचे भाकित तेथे प्रचारासाठी जाऊन आलेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आठवड्यापूर्वी (ता.२४ ऑक्टोबर) 'सरकारनामा'शी बोलताना केले होते. ते खरे ठरले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला बारणे हे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यावेळीही त्यांचे भाकित खरे ठरले होते. त्यांनी दुसरी भविष्यवाणी नुकतीच लोकसभेच्या जागेसाठी ती ही महाराष्ट्राबाहेरील म्हणजे दादरा, नगर,हवेलीच्या बाबतीत केली होती. तेथील विद्यमान खासदार मोहन डेलकर यांनी यावर्षी २२ फेब्रुवारीला मुंबईत येऊन आपल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे ही निवडणूक गेल्या ३० तारखेला झाली.

Shrirang Barne
अजित पवारांना इन्कम टॅक्सची ना नोटीस, ना संपत्तीवर टाच!

त्यासाठी त्याच महिन्यात ७ तारखेला शिवसेनेत आलेल्या डेलकरांच्या पत्नी कलाबेन या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. ही निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी समारोपाची प्रचार सभा घेतली. तर, त्याअगोदर शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री गुलाबराव पाटील आणि १५ शिवसेना खासदार तिकडे प्रचारासाठी जाऊन आले. त्यात बारणे यांचाही समावेश होता. त्यांनी दोन दिवस प्रचार केला. त्यानंतर तेथील परिस्थिती पाहून त्यांनी आपला उमेदवार नक्की निवडून येईल, असा दावा केला होता.

गुजरात म्हणजे मोदी आणि भाजपच्या बालेकिल्यात शिवसेना कशी निवडून येईल, याविषयी सर्वांनाच शंका होती. पण, बारणेंची हे दुसरे भाकीतही खरे निघाले. दादरा, नगर, हवेलीचे प्रशासक प्रफूल्ल खेडा पटेल यांच्या त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली होती. तसे त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिले होते. त्यांनी स्थानिक प्रशासकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने या प्रशासकाविरुद्ध स्थानिक जनतेत मोठा रोष आहे. अडीच लाख लोकसंख्येच्या या मतदारसंघात १८ टक्के मराठी मतदार आहे. शिवाय सहानुभूतीच्या लाटेचाही फायदा होणार आहे. परिणामी शिवसेनेचा यांचा विजय निश्चीत आहे, असे कलाबेन डेलकर यांच्या विजयाचे गणित बारणे यांनी मांडले होते. ते खरे ठरले.

Shrirang Barne
महाराष्ट्राबाहेर भगवा फडकला अन् आदित्य ठाकरे म्हणाले...

सरळ लढतीत श्रीमती डेलकर यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे महेश गावित यांचा पराभव केला. यापूर्वी सातही वेळा डेलकर हे आठ ते नऊ हजारांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, श्रीमती डेलकर यांनी या मतदारसंघात प्रथमच दणदणीत विजय नोंदवला. सहानुभूतीच्या लाटेत त्या विक्रमी ५१ हजार मतांनी निवडून आल्या. त्यामुळे या मोठ्या संख्येने असलेल्या आदीवासी मतांवर डोळा ठेवून भाजपने आदीवासी उमेदवार देऊनही त्यांचा दादरा, नगर, हवेलीत पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com