मावळमधून २०२४ ला उमेदवार मीच...

Shrirang Barne|Shivsena|Maval : माझ्या विजयात सत्तर टक्के भाजपचा वाटा असल्याने त्यांना दुखावले नाही, असे खासदार बारणे म्हणाले...
MP Shrirang Barne Latest News
MP Shrirang Barne Latest News Sarkarnama

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेल्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आज (ता.२२ जुलै) पहिल्यांदाच मतदारसंघात आले. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांचे पुणे विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी २०२४ ला मावळातून लोकसभेला पुन्हा मीच उमेदवार असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

MP Shrirang Barne Latest News
शिवसेना वाचविण्यासाठी ठाकरेंशी चर्चा करूनच घेतला निर्णय, बंडखोर खासदार बारणेंचा दावा

राष्ट्रवादी कॉंग्रेसशी (NCP) असलेली आघाडी तोडण्यासंदर्भात शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भूमिका नव्हती. त्यामुळे पुढचा विचार करुन शिंदे गटाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला, असे खा. बारणे म्हणाले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या भूमिकेशी सहमत आहेत, असा दावा त्यांनी केला. माझ्या विजयात भाजपचा 70 वाटा आहे. त्यामुळे मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दुखावले नाही, असे भाजपवर आतापर्यंत टीका न करण्याचे गुपित त्यांनी प्रथमच उघड केले. त्यांच्या मतावर निवडून आलो असल्याने त्यांचा सन्मान ठेवण्याची माझी भूमिका आहे, असे ते पुढे म्हणाले.

MP Shrirang Barne Latest News
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते, पण शरद पवारांनी…

रोज उठून कोणाच्या घरावर दगड मारण्याची आवश्यकता नसते. ते आपल्या संस्कृतीला शोभत नाही, या शब्दांत त्यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले. महाविकास आघाडी सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. राष्ट्रवादी सर्वाधिक निधीचा वापर करत होती, या शब्दांत त्यांनी शिवसेना सत्तेत असलेल्या राज्यातील अगोदरच्या सरकारवर तोफ डागली. जोपर्यंत युतीत सहभागी होतो, तोपर्यंत केंद्राकडून चांगले सहकार्य मिळत होते. महाविकास आघाडी झाल्यानंतर ते मिळणे बंद झाले, असे त्यांनी सांगितले.

MP Shrirang Barne Latest News
आदित्य यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये; बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला?

मावळ लोकसभा मतदारसंघात पवार परिवारातील व्यक्तीचा मी मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला. आगामी 2024 च्या निवडणुकीला सामोरे जात असताना सगळी परिस्थिती पाहता, हिंदुत्वाचा विचार, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि शिवसेना-भाजप युती असायला पाहिजे यादृष्टीकोनातून हे पाऊल उचलले. ही भूमिका घेतना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना मी मॅसेज केला. त्यानंतर त्यांचा मला फोन आला. मी राज्य व मतदारसंघातील परिस्थिती पाहता भविष्याचा विचार करुन युती होणे आवश्यक असल्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावर त्यांनी तुम्हाला जो वाटतो, तो निर्णय घ्या, असे ते म्हणाले होते. त्यामुळे मी उद्धवसाहेबांशी चर्चा करुनच निर्णय घेतला असल्याचे बारणेंनी सांगितले. एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुख होण्याबाबत कोणताही मनोदय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in