Shinde Government : गद्दारांची पोरं हातावर 'मेरा बाप चोर' हे लिहितील : शिवसेनेच्या तिन्ही 'संजय' मध्ये जुंपली !

Sanjay Raut vs Shinde Government : राजकीय रणांगणावर तिन्ही 'संजय' मधील वाकयुद्ध राज्यातील जनता हतबलपणे पाहत आहे.
Sanjay Raut vs Shinde Government
Sanjay Raut vs Shinde Government Sarkarnama

sanjay raut vs shinde government : "शिवसेना सोडून गेलेल्या 40 आमदार आणि 12 खासदारांची पोरं हातावर 'मेरा बाप चोर' हे लिहितील,"असे विधान ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केले आहे. यावरुन आता शिवसेनेच्या तिन्ही 'संजय'मध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. (mp sanjay raut vs shinde government news update)

राऊतांनी शुक्रवारी नाशिक येथे केलेल्या या विधानावरुन शिंदे गटातील दोन संजय आणि ठाकरे गटातील संजय हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राजकीय रणांगणावर तिन्ही 'संजय'मधील वाकयुद्ध राज्यातील जनता हतबलपणे पाहत आहे.

Sanjay Raut vs Shinde Government
Eknath Shinde : मोदींच्या 'या' निर्णयामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार ; हिवाळी अधिवेशनात गदारोळ ?

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. ही टीका आमदार संजय गायकवाड, आमदार संजय शिरसाट यांच्या जिव्हारी लागली आहे. शिंदे गटातील दोन्ही संजय आक्रमक झाले आहेत, त्यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला. ते माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut vs Shinde Government
NCP : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कोश्यारींना दिली शिवाजी महाराजांची तीन पुस्तके..

उठाव-क्रांती केल्याचा अभिमान

राऊतांवर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्यांनी राऊतांना शिवी दिली. ते म्हणाले, "आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे (शिवी...) संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचे की पडायचे, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू ,"

Sanjay Raut vs Shinde Government
Bhagat Singh Koshyari : राजभवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा ;"कोश्यारींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.."

राऊतांना पिसाळलेलं कुत्र चावलं..

संजय शिरसाट म्हणाले, "संजय राऊतांना पिसाळलेलं कुत्र चावलं आहे. दर वेळी नवा वाद कसा करायचे हे त्यांना माहित आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तोंड का उघडलं नाही. ते अडीच वर्ष झोपा काढत होते का? त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, आमच्या कपाळावर 'गद्दार' कोरलं जाणार आहे ? त्यांच्यापेक्षा जास्त शिवसेना आम्ही पाहिलेली आहे. राऊत हे पगारदार नोकर आहेत. 'सामना'चे संपादकपद त्यांनी का सोडलं, हे त्यांनी सांगावं. त्यांना भुंकण्यासाठी सोडलं आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. ते तीन महिने जेलमध्ये आराम करुन आले आहेत, आता अकलेचे तारे कशाला तोडत आहेत,"

शुक्रवारी नाशिकमध्ये संजय राऊत म्हणाले की, 40 आमदार आणि 12 खासदारांच्या डोक्यावर कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे. दिवार चित्रपटात तसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर आहे, असे लिहले तसेच आता या आमदारांच्या डोक्यावर गद्दारींचा शिक्का बसला आहे.

राऊतांच्या या विधानावरुन तिन्ही 'संजय' मध्ये सुरु असलेला हा वाद आता कुठल्या दिशेनं जाणार, हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com