Sanjay Raut Tweet: बच्चू कडूंना राऊत म्हणाले, 'तुमने बेवफाई की..,तुम आंखे नहीं मिला सकते..' ; शेतकऱ्याचा Video व्हायरल..

MP Sanjay raut tweet on bachchu kadu : घोगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बच्चू कडूंना चांगलेच फैलावर घेतलं.
MP Sanjay raut,  bachchu kadu
MP Sanjay raut, bachchu kadu Sarkarnama

MP Sanjay raut tweet on bachchu kadu : शेतकऱ्यांची कैवारी म्हणून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन बच्चू कडू हे नेहमीच आंदोलन करीत असतात.

शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेणारे बच्चू कडू राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे गटात आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांची त्यांच्यावर नाराजी आहे. त्यांचा प्रत्यय नुकताच आला. एका ज्येष्ठ शेतकऱ्यांने बच्चू कडूंना चांगलेच सुनावलं. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

ठाकरे गटाते नेते, खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ टि्वट करीत बच्चू कडूंना डिवचलं आहे. आमदार बच्चू कडू हे धाराशिव येथे बच्चू कडू दौऱ्यावर जात होते, तेव्हा अर्जुन घोगरे या वयोवृद्ध शेतकरी आजोबांनी कडूंची गाडी अडवली.यावेळी घोगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बच्चू कडूंना चांगलेच फैलावर घेतलं.

MP Sanjay raut,  bachchu kadu
Pune Bypoll News : ज्योतिषाचे भाकीत खरे ठरणार ? ; भाजप चिंचवडमध्ये गड राखणार, पण कसब्यात..

त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करुन राऊतांनी लिहिलं आहे की, “तुमने बेवफाई की वफा का नाम लेकर। हम वफादार बने रहे बेवफा का इल्ज़ाम सेह कर। तुम आंखे नहीं मिला सकते हमारा सबकुछ छीनकर। हम सर उठाकर चल सकते है सब कुछ छोड़ कर ।”

MP Sanjay raut,  bachchu kadu
AAP News : 'आप'च्या सिसोदिया, जैन यांनी या कारणांसाठी दिला राजीनामा

“तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या पण तुम्ही अयोग्य वर्तन केलं. शिंदे फडणवीस महाडाकू आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात. तुमच्याकडून असं वर्तन अपेक्षित नव्हतं. यासाठी आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं का?” अशा शब्दात घोगरे यांनी कडूंना झापलं. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही का त्रास दिलात…? तुमच्याकडून असं वागणं अपेक्षित नव्हतं,अशा शब्दात घोगरे यांनी संताप व्यक्त केला.

घोगरेंच्या या आक्रमकपणाला बच्चू कडूंनी टाळण्याचा प्रयत्न केला. पण घोगरे यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "बच्चू कडूंना ज्या आशेने निवडून दिलं, तसा तो वागत नाही. तो डाकूबरोबर गेला, देवेंद्र आणि शिंदेबरोबर गेला. हे जे काय चाललंय ते योग्य नाही, घटनाबाह्य आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in