Rajya Sabha election : त्यांना कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार आम्हीच ; राऊतांचा निर्धार

राज्यसभेसाठीही ते ईडीचा वापर करतील का अशी भीती वाटते.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama

पुणे : राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होत आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी ७ उमेदवार आखाड्यात उतरल्यानं आता चांगलीच कुस्ती रंगणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

भाजपनं धनंजय महाडिक यांच्या रुपानं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्यानं शिवसेना आणि सत्ताधारी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. यानिमित्तानं घोडेबाजार सुरू होण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुण्यात याबाबत विधान केलं आहे. ते पुण्यात हडपसर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात राऊत बोलत होते. (Rajya Sabha election latest news)

सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक या दोघा कोल्हापूरकर पैलवानांमध्ये दोस्तीत कुस्ती रंगणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी उमेदवार मागे घेईल, अशी शक्यता नाही. संजय राऊत म्हणाले, "राज्यसभेसाठीही ते ईडीचा वापर करतील का अशी भीती वाटते. शिवसेना पक्षाचा ६वा उमेदवार दिला आहे आणि आम्ही जिंकणारच. त्यांना कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार आम्हीच,"

Sanjay Raut
काँग्रेससोबत काम न करण्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण..

"पुणे शहराला दिशा देण्याचे काम आपल्या करायचे आहे. आपले मोजके नगरसेवक आहेत, प्रत्येक जणांचे आदर्श असं काम आहे. जे पळून गेले त्यांना विसरून जा, आपण सगळे टिकून राहिलो, म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. गौतम बुद्ध यांचा एक शब्द जपला पाहिजे तो म्हणजे अहंकार. अहंकार बाजूला ठेवला तर अनेक गोष्टी चांगल्या होतील. हे कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगायला हवं," असा टोला राऊतांनी लगावला.

राऊत म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्याचे दोनच दैवत आहेत. या राज्याचे शिवसेना नेतृत्व करतेय हे आपलं भाग्य आहे. संजय पवार यांना राज्यसभेत पाठवतो आहे, हे फक्त शिवसेना करू शकते,"

Sanjay Raut
Singer KK : चेहरा अन् डोक्याला जखमा ; के.केंच्या मृत्यूचं गुढ वाढलं

"देशात सध्या जे चाललं आहे, ते लोकशाहीला पुरक नाही. छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये उमेदवार बाहेरचे आहेत. काँग्रेसला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. काँग्रेसनं देशाचं नेतृत्व करावं हे सांगणारे आम्ही आहोत," असे राऊत म्हणाले.

"जे विरोधात उभे राहतील त्यांच्यावर धाडी टाकण्यात येतील. महाराष्ट्रात सुद्धा दबावाचं राजकारण सुरु आहे. सरळ हुकुमशाही जाहीर करा. सत्येंद्र जैन हिमाचलचे प्रभारी म्हणून तयारी करीत होते, पण भाजपला त्यांची अडचण झाल्यानं त्यांना अटक करण्यात आली," असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com