Pune Loksabha By Election: 'पुणे लोकसभे'वरुन आघाडीत मिठाचा खडा? काँग्रेस,राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर राऊतांचं नवं ट्विट

Sanjay Raut New Tweet : ''जिंकेल त्याची जागा याच सूत्राने...''
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Pune : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादीमधील नेतेमंडळींकडून करण्यात आलेल्या दावे प्रतिदाव्यांनी महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. एकीकडो पुणे लोकसभेची जागा काँग्रेस व राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच आता यात ठाकरे गटानं उडी घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन सूचक ट्विट केलं आहे.

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलं आहे. या टि्वटद्वारे त्यांनी महाविकास आघाडीत पुणे लोकसभेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल असा सल्ला संजय राऊतांनी आघाडीतील काँग्रेस , राष्ट्रवादीला दिला आहे.

Sanjay Raut
Ajit Pawar News : अजितदादा गौतमीच्या कार्यक्रमाला येणार का? ; कार्यकर्त्यांनी धरला आग्रह..

राऊतांनी टि्वटमध्ये काय म्हटलंय?

पुणे लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) त तिढा निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळे विधान करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊतांनी मर्मावर बोट ठेवतानाच आघाडीला सबुरीचा सल्लाही दिला आहे.

राऊत म्हणाले, '' कसेल त्याची जमीन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर 'कसबा' प्रमाणे पुणे 'लोकसभा' पोटनिवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल'' असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut
Koradi project news : वादग्रस्त १३२० मेगावॅट प्रकल्प कोराडीत करण्याची ‘प्रहार’चीच आहे मागणी !

अजित पवारांचा दावा काय ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे. पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, असं अजित पवार(Ajit Pawar) म्हणालेत.

तर, काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही. आम्ही बोलून काहीही उपयोग नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून याबाबत निर्णय घेतील. आज काँग्रेसने कितीही काहीही म्हटलं तरी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे अशी भूमिका अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडली होती.

Sanjay Raut
Shrigonda Politics : श्रीगोंद्याच्या राजकारणात टि्वस्ट; काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांची मोठी घोषणा; विधानसभा निवडणूक...

वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर...

माजी मंत्री व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या पुणे लोकसभेवर ठोकलेल्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार म्हणाले,'अजितदादा पुण्याच्या जागेवर दावा करत असेल तर त्यांनी सांगावं कसब्याची जागा आम्ही किती दिवसात जिंकली? त्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अजितदादांनी फारकत पडेल असं काही करू नये, ही त्यांना विनंती आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com