Amol Kolhe News : खासदार कोल्हेंना सोबत घेत कान्होराज महाराज पालखीचं सारथ्यं केलं लांडेंनी; व्हायरल फोटोने रंगली चर्चा !

Amol Kolhe News : खासदार कोल्हे बसलेल्या पालखी रथाचे विलास लांडे कडुन सारथ्यं
Amol Kolhe, Vilas Lande
Amol Kolhe, Vilas Lande Sarkarnama

Shirur Lok Sabha Constituency : शिरुर तालुक्यातील केंदुर येथे कान्होराज महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालखी रथावर खासदार अमोल कोल्हे बसले होते. यावेळी "तुम्ही बसा मी रथ चालवतो",असा इशारा करत माजी आमदार विलास लांडेंनी पालखी रथाच्या बैलांची वेसन धरुन पालखी रथाचे प्रस्थान केल.

शिरुर लोकसभा मतदार संघात माजी आमदार विलास लांडे निवडणुक उमेवार म्हणून इच्छुक आहेत. त्यातच आता पालखी रथात कोल्हेंना बसुन रथ लांडेच्या ताब्यात दिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Amol Kolhe, Vilas Lande
Amol Kolhe News : 'शिरूर' पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी खासदार कोल्हे लागले कामाला !

मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांचे शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency ) वाढदिवशी त्यांच्या नावाचे 'भावी खासदार' अशा आशयाचे फ्लेक्स लावले होते. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या ( Amol Kolhe ) नाराजीनंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शिरुर लोकसभा लढण्याचे संकेत दिले होते. मात्र, काही दिवसापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत शिरुरमधुन पुन्हा कोल्हेच उमेदवार असणार असे संकेत पवारांनी दिले आहेत. पवारांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याने एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले कोल्हे आणि लांडे शिरुर तालुक्यात एकत्र एकाच कार्यक्रमात एकत्र दिसून आले.

Amol Kolhe, Vilas Lande
Chitra Wagh Vs Jitendra Awhad : चित्रा वाघ-जितेंद्र आव्हाड ट्विटरवर भिडले; ‘एंटी चेंबर’ ते ‘कुलू मनाली’ सगळंच चव्हाट्यावर आलं

दरम्यान, आज खासदार अमोल कोल्हे शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर असून विविध विकास कामांचा उद्घाटन सभारंभ आहे. यावेळी खासदार कोल्हे आणि लांडे एकत्र दिसून आल्याने दोघांमधील वाद निवळला आहे,अशी चर्चा रंगली आहे.

या पालखी सोहळ्याला विलास लांडे, प्रदीप वळसे पाटील, प्रकाश बाप्पू पवार, सविता बगाटे, शेखर पाचुंदकर, सूर्यकांत थिटे, विठ्ठल ताथवडे, सविता पऱ्हाड, प्रमोद पऱ्हाड, रामशेठ साकोरे, नंदकुमार पिंगळे, शंकर जांभळकर, अमोल जगताप यांच्यासह केंदूर व पंचक्रोशीतील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited by - Rashmi Mane

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com