मेट्रो विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा युद्धपातळीवर सुरू करण्याची खासदार बापट यांची लोकसभेत मागणी

पुणे आणि भोवतालाचा अलीकडच्या काळात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे पुणे शहराच्या प्रवासाच्या पायाभूत सुविधांवर ताण आला आहे.
मेट्रो विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा युद्धपातळीवर सुरू करण्याची खासदार बापट यांची लोकसभेत मागणी
Girish Bapatsarkarnama

नवी दिल्ली : पुणे आणि परिसरात लहान, मध्यम आणि अवजड उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुण्याचे झपाट्याने शहरीकरण होत असून, रोजगारासाठी अन्य जिल्ह्यातून पुण्यात होणारे स्थलांतरही वाढले आहे. त्याचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर होत आहे. शहरीतील वाहतुकीची स्थिती देखील चिंताजनक होत असल्याने पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व विस्तार प्रकल्प तातडीने सुरू करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat ) यांनी आज लोकसभेत केली.

Girish Bapat
शेतकरी संघटना मागतेय उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई

पुण्यातील मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास जात आहे. महाराष्ट्र मेट्रोने फेज दोनसाठी सर्वेक्षण आणि नियोजन सुरू केले आहे, असे निदर्शनास आणून देताना खासदार बापट यांनी सध्याच्या ३३.१ किलो मीटर मेट्रो मार्गांचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्यातील ८२.५ किलो मीटर लांबीच्या मार्गाचा विस्तार करण्यासाठी अहवाल (डीपीआर) तातडीने करण्याची गरज असल्याचे नमूद केले. यामधे वनाज ते चांदणी चौक (१.५ किमी), रामवाडी ते वाघोली (१२ किमी), हडपसर ते खराडी ५ किमी), स्वारगेट ते हडपसर (७ किमी), खडकवासला ते स्वारगेट (१३ किमी) आणि एसएनडीटी ते वारजे (८ किमी) तसेच पीसीएमसी ते निगडी ४.४१ किमी आणि स्वारगेट ते कात्रज ५.४६ किलो मीटरचा सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

Girish Bapat
देशातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर फडकणार ६ एप्रिलला पक्षाचा झेंडा...

पुणे आणि भोवतालाचा अलीकडच्या काळात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे पुणे शहराच्या प्रवासाच्या पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. लहान, मध्यम आणि अवजड उद्योगांच्या वाढीमुळे शहरातील वाहतूक चिंताजनक दराने वाढत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जलद गतीने सुरू करण्याची गरज आहे. यातून वाहतूक कोंडीची चिंताजनक परिस्थिती कमी करण्यासाठी मदत होईल. त्यामुळे गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री यांना विनंती करतो की, फेज दोन - पुणे मेट्रोच्या सर्व प्रकल्पांना मंजुरी देऊन त्याचे काम जलद गतीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार बापट यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in