Anil Bonde : पवारांनी जाणता राजा बिरूद जबरदस्तीने लावून घेतले; अनिल बोंडेंचे वक्तव्य

Anil Bonde : 'महाविकास आघाडीने कामे बंद पाडली. पण फडणवीस राज्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्नशील..'
Anil Bonde Latest News
Anil Bonde Latest News Sarkarnama

दौंड : माजी कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचा जाणता राजा हे बिरूद जबरदस्तीने लावून घेतले व ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

दौंड शहरात दौंड कृषी महोत्सव २०२३ मध्ये बोलताना अनिल बोंडे यांनी ही टीका केली. ते म्हणाले, ''शरद पवार यांनी फक्त बारामती तालुक्याचा विकास केला. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्याची कधी चिंता केली नाही. सिंचनाचा अनुशेष वाढल्याने आत्महत्या वाढल्या. जाणता राजा हे बिरूद जबरदस्तीने लावून घेणारे पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना आत्यमहत्येस प्रवृत्त केले''.

Anil Bonde Latest News
Pimpri Chinchwad News : "आक्रीतच घडले, ज्यांच्याविरूद्ध तक्रार मंत्र्यांनी त्यांच्याकडेच सोपवला तपास!"

''संपूर्ण राज्यामध्ये सिंचनाचा अनुशेष दूर केला असता तर आत्महत्या टळल्या असत्या. त्यांनी उसाला महत्व दिले कारण त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता. उसासाठी पुढाकार घेताना त्यांनी कधी सोयाबीन किंवा कापसासाठी पुढाकार घेतला नाही. म्हणून ते आत्महत्येस जबाबदार आहेत'', असा आरोप त्यांनी केला.

Anil Bonde Latest News
Vikhe : विश्‍वासघात झाला की थोरातांच्या संमतीने अपक्ष उमेदवारी केली? मंत्री विखे-पाटलांचे प्रश्‍नचिन्ह

''तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पैनगंगा - वैनगंगा सिंचन प्रकल्पासाठी ८२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्प जाहीर केला. त्यांनी कामे सुरू केली, संपादन केले. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्याने कामे बंद पडली होती. पण फडणवीस आता संपूर्ण राज्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत'', असं अनिल बोंडे यावेळी म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com