Amol Kolhe News : संभाजी महाराजांवरुन राजकारण करु नका ; अमोल कोल्हे म्हणाले, 'त्यांचे विचार..'

Chhatrapati Sambhaji Maharaj News : हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या उल्लेख धर्मरक्षक असा केला होता.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama

Chhatrapati Sambhaji Maharaj News : छत्रपती संभाजी महाराज यांचा आज (सोमवारी) ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दिन आहे. या निमित्तानं राज्यात विविध कार्यंक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज पुण्यात या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे शहरात पुन्हा बँनरबाजी सुरु झाली आहे. "स्वराज्य रक्षक संभाजी महाराज "असे बॅनर पु्ण्यात राष्ट्रवादीनं लावले आहेत. संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या उल्लेख धर्मरक्षक असा केला होता. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते,या विधानावर ते अद्यापही ठाम आहे. अजित पवार यांच्या या विधानानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या'राज्याभिषेक दिना'निमित्ताने त्यांचे पडसाद अजूनही उमटत असल्याचे दिसते. आज संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दिन आहे.

पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या विश्व हिंदू मराठा परिषदेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज नगर पुणे असा बोर्ड पुतळ्यासमोर लावला आहे. फुलांनी धर्मवीर असं लिहून अभिवादन केले आहे.

Amol Kolhe
Sanjay Raut News : दावोस दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांना राऊतांचं खुलं आव्हान ; 'तुमच्या नाकाखालून..'

यावर अमोल कोल्हे म्हणाले, "संभाजी महाराज यांचा इतिहास पुढे घेऊन जाणे महत्त्वाचं आहे.यात राजकारण करू नये. छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, त्यांचे विचार मलिन करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वराज्य रक्षक ही संकल्पना व्यापक आहे,"

Amol Kolhe
Chhatrapati Sambhaji Maharaj News : संभाजी महाराज धर्मवीर की धर्मरक्षक ? ; नेत्यांमध्ये रंगलयं टि्वटर वॅार

पवारांच्या या विधानानंतर विरोधी पक्षाने विविध ठिकाणी आंदोलन करीत याचा निषेध केला होता. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यानंतर आज पुन्हा समाजमाध्यमांवर संभाजी महाराज यांना अभिवादन करताना काही नेत्यांनी त्यांना उल्लेख 'धर्मवीर'असा केला आहे, तर काहींनी त्यांचा उल्लेख "धर्मरक्षक"असा केला आहे. समाज माध्यमांवरील शुभेच्छांवर नजर टाकली तर लक्षात येते की स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर वरुन वाद रंगत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, आमदार नितेश राणे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , पुण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी नेत्यांनी टि्वट करीत संभाजी महाराज यांनी अभिवादन केले आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ठाम आहेत. गिरीश महाजन यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देताना महाराजांचा उल्लेख धर्मवीर असाच केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com