स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची भाजप नगरसेवकांचीच कबुली!

भाजपची अवस्था ही, मात्र 'अतिथी तुम कब जाओगे', अशी झाल्याचे दिसून आले.
Amol Kolhe
Amol Kolhesarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सभा संपेपर्यंत म्हणजे रात्री नऊ पर्यंत सहा तास बुधवारी (ता २०)उपस्थित होते. या सभेत सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीच शहरातील स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पक्षाला घरचा आहेर दिला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आता हा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

दरम्यान, सभा संपेपर्यंत सलग सहा तास कोल्हेंची मॅरेथॉन उपस्थिती राहिल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपची अवस्था ही, मात्र 'अतिथी तुम कब जाओगे', अशी झाल्याचे दिसून आले. कारण त्यांना रेटून काम नेता आले नाही. तसेच विरोधकांना बोलू न देता त्यांचा आवाजही दाबता आला नाही. उलट विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असल्याने या पक्षाचे नगरसेवक संधी मिळाल्याने तावातावाने बोलले. दुसरीकडे आपल्याच नगरसेवकांनी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावर जोरदार हल्लाबोल केल्याने भाजपची दुहेरी कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.

Amol Kolhe
काँग्रेसला धक्का; नगराध्यक्ष मोदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी महापालिकेतील पक्षाच्या नगरसेवकांची शहरात नुकतीच (ता.१६) बैठक घेतली. त्यावेळी पालिका सभेत सभागृहात बोलू दिले जात नसल्याची तक्रार या नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे पालिका सभेचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी आलो होतो. तसेच आपल्या पक्षाच्या नगरसेवकांवर वॉच ठेवण्यासाठी नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर नजर ठेवण्यासाठी आलो होतो. असे कोल्हे यांनी सुरवातीसच स्पष्ट केले. पालिका सभेचे कामकाज पाहिल्यानंतर कामकाज ढकलण्याची प्रवृत्तीच दिसून आली, असा हल्लाबोल त्यांनी सहा तासाच्या पालिका सभेच्या कामकाजाच्या निरीक्षणानंतर केला.

Amol Kolhe
`सुनील शेळकेंना गळ टाकला अन् 30 वर्षांचं रखडलेलं काम झालं...`

स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावरून आपल्याच नगरसेवकांनी लक्ष्य करताच भाजपने ते प्रशासनावर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, असा बचाव त्यांनी सभेत आयुक्तांवर झालेल्या टीकेच्या भडीमारावर केला. काही विषय स्थगित ठेवून काही, तरी लपवायचा आणि झाकायचाही सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न दिसून आला, अशी तोफ त्यांनी डागली. स्मार्ट सिटीच्या उपकंत्राटाचे पुन्हा उपकंत्राट देणे या बेकायदेशीर कृत्यावर बोलणारे शिवसेनेचे नगरसेवक व माजी गटनेते राहूल कलाटे यांना पीठासीन अधिकारी महापौरांनी बोलण्यापासून रोखणे धक्कादायक होते. अशी टिपण्णी त्यांनी केली. अशा पद्धतीने झाकण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे धूर आहे. आग लागलेली आहे. मात्र, त्याची उब सत्ताधाऱ्यांच्या मूठभर नातेवाईकांना होणार असेल, तर त्याच्या मूळापर्यंत जाणार असा इशारा त्यांनी दिला. तो देताना त्यांचा रोख हा पुन्हा स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराकडे होता. दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांच्याविषयी एका पोर्टलवरील आक्षेपार्ह लिखाण निंदनीय असल्याचे सांगत त्याचा त्यांनी धिक्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com