‘नथुराम’ अमोल कोल्हेंना पश्चाताप; गाठला इंद्रायणी घाट!

नथुराम गोडसेची भूमिका केल्याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली
MP Dr Amol Kolhe
MP Dr Amol Kolhesarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरून राज्यात मोठे वादंग उठले होते. गोडसेची भूमिका साकारणारे खासदार कोल्हे यांनी आता पश्चातापाची भावना व्यक्त केली आहे. गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदीतील इंद्रायणी घाटावरील महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि आत्मक्लेश करत दिलगिरी व्यक्त केली. (MP Amol Kolhe apologized for playing the role of Nathuram Godse)

खासदार कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. ही बातमी समोर येताच राष्ट्रवादीतून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भूमिकेला आणि चित्रपट प्रदर्शित होण्याला विरोध केला होता. काँग्रेस पक्षाकडून चित्रपटाला विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र, कोल्हे यांनी आपण नथुरामच्या विचारसरणीला विरोध करणारा आहे, असे सांगून चित्रपटातील भूमिकेचे समर्थन केले होते.

MP Dr Amol Kolhe
अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

दरम्यान, वादानंतर कोल्हे यांना नथुरामची भूमिका साकारल्याबद्दल पश्चाताप होत असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच त्यांनी आज (ता. २९ जानेवारी) महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. त्या ठिकाणी आत्मक्लेश करीत या चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे.

MP Dr Amol Kolhe
मी आणि फडणवीस कमळासाठी आग्रही होतो; पण मोहिते-पाटलांचा निर्णय योग्य ठरला

‘व्हाय आय किल गांधी’ चित्रपटात नथुरामची भूमिका केली. पण, ती विचारधारा स्वीकारली, असा त्याचा अर्थ अजिबात नाही, हे स्पष्ट करताना खासदार कोल्हे यांनी सांगितले की, एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली आहे, ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईमध्ये तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले, ही महत्त्वाची बाब आहे.

MP Dr Amol Kolhe
उंदरगावच्या मनोहर भोसलेला जामीन मंजूर

महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही, हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे खासदार कोल्हे यांनी आळंदीतील गांधी स्मारकाला भेट दिल्यानंतर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com