पुण्यात पाण्यासाठी आंदोलन : प्रश्‍नाची सोडवणूक राहिली बाजूला; प्रशासनाने दाखल केला गुन्हा !

पाण्याच्या विषयावरून याआधीदेखील तक्रार करण्यात आली होती. मात्र, पाण्याचा प्रश्‍न कायम आहे.
Pmc Pune
Pmc PuneSarkarnama

पुणे : कोंढवा बुद्रुक येथील पाण्याच्या समस्येवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी शिवाजीननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मनसेचे शहराध्यक्ष व महापालिकेतील माजी गटनेते वसंत मोरे यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Pmc Pune
करुणा शर्मा तर परळीतून लढणार होत्या; कोल्हापुरातून लढणार हे मोठे आश्चर्यच!

याप्रकरणी अशोक राजाराम बनकर (वय 59, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन वसंत मोरे, साईनाथ बाबर व इतर १०० ते १२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक ४७ येथील मागील काही दिवसांपासून पाण्याची समस्या सुरु आहे.

Pmc Pune
अखेर मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपसमोर झुकले अन् विधानसभा अध्यक्ष जिंकले

पाण्याच्या विषयावरून याआधीदेखील तक्रार करण्यात आली होती. मात्र, पाण्याचा प्रश्‍न कायम होता. ‘मनसे’च्या वतीने सोमवारी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.त्यावेळी मोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी थांबण्यास सांगितले. मात्र, मोरे व त्यांचे कार्यकर्ते महापालिकेच्या ते नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. तेथे त्यांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

१४ मार्चला पुणे महापालिकेची मुदत संपली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार प्रशासक या नात्याने सध्या काम पाहात आहेत.पालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे. अशावेळी नागरीकांचा पाण्याचा मूळ प्रश्‍न सोडविण्याची तत्परता दाखविण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com