भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठीच कचरा डेपोला लावली आग : राष्ट्रवादीचा हल्लाबोल

चौकशी समिती नेमून या आगीची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
Ajit Gavhane
Ajit GavhaneSarkarnama

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन शहराध्यक्ष मिळताच पिंपरी-चिंचवडची राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) भलतीच आक्रमक झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या रेडी रेकनरच्या दरावरून पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी भाजपचे (BJP) शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगेंवर (Mahesh Landage) बुधवारी (ता. ७ एप्रिल) तोफ डागली होती. शहरात चिंचवडपेक्षा भोसरीत रेडी रेकनरचा दर कमी असल्याचे सांगत आमदार लांडगेंचे भोसरी व्हिजन-२०२० चे गाजर दिवाळखोरीत निघाले असल्याची टीका गव्हाणेंनी केली होती. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा आमदार लांडगे यांचे नाव न घेता भाजपवर शहराच्या मोशी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीवरून थेट हल्लाबोल केला. (Moshi sets fire to garbage depot to cover up corruption of BJP leaders : NCP alleges)

मोशी कचरा डेपोला बुधवारी (ता. ६ एप्रिल) सायंकाळी लागलेली आग ही संशयास्पद आहे. कोट्यवधी रुपयांची कामे न करताच बिले उचलणाऱ्या भाजपधार्जिण्या ठेकेदारांना आणि त्यातून भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप नेत्यांना वाचविण्यासाठी ती लावण्यात आल्याचा संशय गव्हाणे यांनी व्यक्त केला, त्यामुळे चौकशी समिती नेमून या आगीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. अन्यथा पालिकेसमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Ajit Gavhane
वसंत मोरेंना सुनावत मुस्लिम पदाधिकाऱ्याकडून राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन

मोशी कचरा डेपोत लागलेली मोठी आग अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. या आगीबाबत सर्वच स्तरावरून संशय व्यक्त होत आहे. गव्हाणेही त्याविषयी साशंक आहेत. मोशी कचरा डेपोचे व्यवस्थापन पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. तेथे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या जातात. त्यावर पालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. कचरा डपोतील ठेकेदारी पद्धतीने सुरू असलेली कामे ही भाजप आमदारांच्या मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली आहेत, असा दावा गव्हाणे यांनी केला आहे.

Ajit Gavhane
‘कात्रज’चे अध्यक्ष होताच तिसऱ्याच दिवशी केशरताई पवारांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

काेरोना काळात कोणतीही कामे न करता या ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, कॅपिंग, औषध फवारणीसारखी करोडो रुपयांची कामे भाजपच्या कारभाऱ्याने आपल्या बगलबच्च्यांना देऊन त्याद्वारे मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. यातील एकही काम पूर्णत्वास गेलेले नाही. सत्तेच्या जोरावर मुदतवाढ देऊन ठेकेदार पोसण्याचे काम भाजप सत्ताधाऱ्यांनी केले. यापुढेही ही कामे लवकर होण्याची शक्यता धूसर असल्यामुळे ठेकेदारांना वाचविण्यासाठी आणि त्याद्वारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत मोशी कचरा डेपोच्या माध्यमातून लुटलेली कोट्यवधींची माया दडपण्याचा हा प्रयत्न या आगीच्या माध्यमातून केला असल्याची शंका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गव्हाणे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com