मोरे म्हणतात; माझ्या निष्ठा आजही राज ठाकरेंसोबत!

माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्याविषयी प्रचंड आदर तर पुण्यातल्या पक्षातील सहकाऱ्यांविषयी नाराजीची भावना दिसली.
Vasant More on Raj Thackeray, Vasant More on MNS
Vasant More on Raj Thackeray, Vasant More on MNSSarkarnama

पुणे : माझ्या शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली आहे. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नाही. आमच्याकडे राज ठाकरे यांचा शब्द अंतीम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातल्या उत्तरसभेला मी जाणार आहे, असे सांगत सध्या सुरू असलेल्या घडमोडींवर मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी स्पष्टीकरण दिले. (Vasant More on Raj Thackeray)

Vasant More on Raj Thackeray, Vasant More on MNS
पुन्हा काॅंग्रेसमध्ये येणार का, या प्रश्नावर शरद पवारांनी पत्रकाराला झापले...

माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, माझी निष्ठा राज ठाकरेंशी आजही आहे. इतर पक्षातून येणाऱ्या आमंत्रणाबाबत विचारले असता, मोरे म्हणाले, ‘‘मी मनसेतच आहे. मनसैनिक म्हणून मी काम करीत राहणार आहे. भविष्यात काय घडेल ते येणारा काळच ठरवेल. अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे, असे सूचक वक्तव्य देखील मोरे यांनी केले. गेली पंधरा वर्षे मी दक्षिण पुण्यात काम करीत आहे. मनसेचं काम मी मोठ्या निष्ठेने या काळात केले. दक्षिण पुण्यात मनसे म्हणजे वसंत मोरे असे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल, असेही मोरे यांनी सांगितले.

Vasant More on Raj Thackeray, Vasant More on MNS
पंकजा मुंडेंनी तुळजा भवानीकडे लावला कौल : पण इच्छा पूर्ण होणार का...

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयावर मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यातनंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांना आज हटवण्यात आले. माजी नगरसेवक व मोरे यांचे जवळचे मित्र साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली होती. त्यावर राज्य तसेच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही यास विरोध केला होता. पक्षाचे पुण्यातील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मला माझ्या प्रभागात शांतता हवी, असल्याचे म्हटले होते.

गेले दोन-चार दिवस या विषयावर पक्षात वाद सुरू होता. या पाश्‍र्वभूमीवर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी आज मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वसंत मोरे यांना पदावरून हटवत नगरसेवक साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे आज दुपारी जाहीर करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in