Monika Hargude News: अजित पवार गटाच्या पुणे महिला जिल्हाध्यक्षपदी मोनिका हरगुडे यांची नियुक्ती

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पुणे महिला जिल्हाध्यक्षपदी मोनिका हरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली.
Monika Hargude
Monika Hargude Sarkarnama

Shikrapur News: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सध्या जोरदार हालचाली करत असून, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने अजित पवारांची राष्ट्रवादीदेखील अॅक्शन मोडवर आली असून, पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पुणे महिला जिल्हाध्यक्षपदी मोनिका हरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोनिका नवनाथ हरगुडे या शिरूर (जि. पुणे) पंचायत समितीच्या माजी सभापती असून, आता महिला राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्याकडून त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

Monika Hargude
Rohit Pawar On Ajit Pawar:..तर राज्य सरकारच खासगी कंपनीला चालवायला द्या; रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा

मोनिका हरगुडे या शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या कट्टर समर्थक मानल्या जात होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर हरगुडे यांना जिल्हाध्यक्षपदासाठी निमंत्रण मिळाल्याची चर्चा जिल्ह्यात होती.

आता तीच चर्चा वास्तवात आली असून, पुण्यातील एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते व चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून हरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली.

सणसवाडी (ता. शिरूर) येथील माजी सरपंच नवनाथ हरगुडे हे त्यांचे पती असून, २०१७ मध्ये त्या पंचायत समितीवर पहिल्यांदा उपसभापती तर २०१९ मध्ये त्यांनी सभापती म्हणून कार्यभार पाहिलेला आहे. आता मोनिका हरगुडे यांच्यावर महिला राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Edited By : Ganesh Thombare

Monika Hargude
Mumbai Senate Elections: सिनेट निवडणूक स्थगित का केली ? उच्च न्यायालयाचा सवाल; ३ ऑक्टोबरला होणार फैसला ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in