मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोदी-शहांचा अपेक्षाभंग झालाय : शिवसेना नेत्याचे सूचक विधान

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व जनतेची सहानुभूती मिळत आहे.
Eknath Shinde-Narendra Modi-Amit Shah
Eknath Shinde-Narendra Modi-Amit ShahSarkarnama

कुरकुंभ (जि. पुणे) : शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार पक्षातून बाहेर पडले. मात्र, सर्वसामान्य शिवसैनिक उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर राहिले, त्यामुळेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray )यांच्या दौऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व जनतेची सहानुभूती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी टीका शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली. (Modi-Shah's disappointment regarding Chief Minister Eknath Shinde: Laxman Hake)

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके हे दौंड तालुक्यात एका खाजगी कार्यक्रमानिमित्तआले होते. त्या वेळी त्यांनी सरकारनामाशी बोलताना वरील गौप्यस्फोट केला. हाके म्हणाले की, सुमारे पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात सत्तेेवर आले आहे. राज्यातील तरुणांना रोजगार, महिलाची सुरक्षा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे, पीकविमा, सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील उद्योग गुजरात व इतर राज्यात गेल्याने हजारो तरुणाच्या रोजगाराची संधी गेल्याने अपयशी ठरले आहे.

Eknath Shinde-Narendra Modi-Amit Shah
...म्हणून विश्वराजने अमेरिकेतच राहावे, अशी माझी इच्छा होती : महाडिकांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट

राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री व मंत्री राज्यात सत्कार घेण्यात व राजकीय विरोधकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानत आहेत हे दुर्दैवी आहे. राज्यात सत्तांतर होऊनही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा व आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून एकनाथ शिंदेबाबत मोदी व शहांचा अपेक्षाभंग झाला आहे, असा दावाही हाके यांनी या वेळी बोलताना केला.

Eknath Shinde-Narendra Modi-Amit Shah
हर्षवर्धन पाटील-दत्तात्रेय भरणे यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागणार!

राज्यातील अनेक प्रश्न आवासून उभे असताना मुख्यमंत्री समर्थक आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाण्यात धन्य मानतात. हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणीबाब आहे, अशी बोचरी टिकाही लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यावर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in