Prakash Ambedkar vs Narendra Modi : बिगर भाजप सरकार आलं तर मोदी-शहांना जेलमध्ये टाकू; आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar news : ईडीच्या धाकामुळं सर्वजण मुजरा करत असल्याचाही केला उल्लेख
Prakash Ambedkar, Narendra Modi
Prakash Ambedkar, Narendra ModiSarkarnama

Ambedkar attacks on Modi : देशात २०२४ मध्ये बिगर भाजपचे (BJP) सरकार येऊ द्या, त्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांना तुरुंगात टाकणार, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit) डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथे जाहीर सभा झाली. तेथे आंबेडकर बोलत होते. यावेळी आंबेडकर म्हणाले की, देश चालवायला निधी पुरत नाही, म्हणून पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी एखाद्या दारुड्यासारखे कारखाने विकतायत. २०२४ मध्ये बिगर भाजप सरकार आले तर मोदी-शहांना तुरुंगात टाकणार आहे.

Prakash Ambedkar, Narendra Modi
Shivsena Symbol News : शिंदेंनी निवडणूक आयोगात वेळेवर टाकला डाव; ठाकरेंची कोंडी? : लेखी युक्तीवादातील महत्त्वाचा मुद्दा समोर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "नेहरुंनी म्हटलं होतं की हातात तंत्रज्ञान आलं आहे. आता देशात कारखाने उभे करणार. त्यानुसार देशात कारखाने उभे झाले. ते कारखाने देशाचा आर्थिक कणा बनले आहेत. आज मात्र हाच आर्थिक कणा मोदी दारुड्यासारखे विकत आहेत. देश चालविण्यासाठी पुरेशा निधी जमा होत नाही. त्यामुळं कारखाने, देशाची संपत्ती विकण्याचा सपाटाच मोदींनी लावला आहे."

Prakash Ambedkar, Narendra Modi
Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो'च्या समारोपाकडे राष्ट्रवादी-शिवसेनेची पाठ; पटोले, चव्हणांचीही अनुपस्थिती

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत केलल्या विधानावरही यू टर्न घेतला आहे. आंबेडकर म्हणाले होते की, नरेंद्र मोदी केंद्रीय तपास यंत्रांचा गैरवापर करीत नाहीत. देशाच्या भल्यासाठीच ते अशा यंत्रणांना कामाला लावतात. आज मात्र आंबेडकर यांची भाषा बदलेली दिसली. ते म्हणाले की, "सध्या केंद्राकडून ईडीचा धाक दाखविला जात आहे. त्यामुळे सर्वजण त्यांना मुजरा करत आहेत."

Prakash Ambedkar, Narendra Modi
Amol Kolhe News : आघाडीने बहिष्कार टाकलेल्या शिंदेंच्या बैठकीला कोल्हे एकटेच हजर; राजकीय चर्चा जोरात...

यासह देशात बिगर भाजप सरकार आलं तर मोदींना तुरुंगात टाकू, असा पुनरुच्चारही आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, "इथला मतदार हा देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजप, बिगर आरएसएस सरकार येऊ द्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in