Narayan Rane : मोदी जे बोलतात ते करून दाखवतात; नारायण राणेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी 20 परिषदेचे उद्घाटन केले
Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama

Narayan Rane : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात'', असं म्हणत नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. पुण्यात आजपासून जी 20 परिषदेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 'मी नेहमीच गोड बोलतो', असं म्हणत त्यांनी फटकेबाजी केली.

जी-20 निमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे म्हणाले, ''जी 20 या अंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. त्यमुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करतो आहोत. अमेरिका, चायना, जपान जर्मनीनंतर भारत पाचव्या स्थानावर येण्याच्या प्रयत्न करत आहे. जगातील अनेक शहरातील विकास कसा येईल? याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत '', असं यावेळी ते म्हणाले.

Narayan Rane
Accident news : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपात्कालीन लॅंडिग

''शहरांचे स्वरूप कसे असावे, याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल. याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार निधी उपलब्ध करेल. आपण आपल्या नेत्यांच्या कुठल्या ही पक्षाच्या बौद्धिक गोष्टीचा कमी लेखू शकत नाहीत. सरकार बदलले की निर्णय बदलतात. या गोष्टीला मी सहमत नाही. मी 32 वर्ष कुठल्या न कुठल्या खात्याचा मंत्री होतो. निर्णय बदलत नाहीत तर दृष्टिकोन बदलतो. उद्योग बाहेर जात नाहीत. पण हे फक्त राजकारण केलं जात आहे. उद्योग बाहेर जातात या चुकीच्या बातम्या आहेत'', असं ते यावेळी म्हणाले आहेत.

Narayan Rane
Elections : नाट्यमय घडामोडी घडणार? शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

''जे राज्य कर सवलत देईल त्यानंतर बाहेरच्या कंपनी तिथे येऊन गुंतवणूक करतात. देशाच्या इतर भागा पेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत. उद्योग बाहेर जातात पण परत महाराष्ट्रात परत येतात. माझ्या जवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रीपद आहे. उद्योग महाराष्ट्रात येण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. 200 कोटीचा ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यात येईल'', असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Narayan Rane
Sharad Pawar News : फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर शरद पवारांची नाराजी

''अमेरिकेचा जी डी पी 20 ट्रिलियन आहे. तर भारत 5 पर्यंत पोहचू पाहतो आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती भारताची सुधारावी याचा परिणाम सर्व सामान्यांना होतो हा जी 20 परिषदचा सामान्य लोकांना फायदा आहे. नागरिकांच्या उत्पन्नावरून जी डी पी ठरवल्या जातो. भारत 80 कोटी लोकांना अन्न मोफत देत आहे. त्यामुळे जी 20 चा लाभ सर्व सामान्यांसाठी आहे'', असंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com