मनसेचे अमेय खोपकर म्हणतात; सुरु राहू दे तुमचं राजकारण बंद नको चित्रीकरण !

लॉकडाऊनच्या काळात चित्रपट,नाटक व संबंधित तंत्रज्ञ, कामगार यांनी बंदमुळे बरंच भोगलंय.आता पुन्हा एक दिवस काम बंद ठेवलं तर आर्थिक नुकसान सोसावं लागेल.
मनसेचे अमेय खोपकर म्हणतात; सुरु राहू दे तुमचं राजकारण बंद नको चित्रीकरण !
Ameya KhopkarSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील दुर्दैवी दुर्घटना, शेतकरी आंदोलन याबद्दल आम्हाला नक्कीच सहानुभूती आहे. पण त्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’चा हाक देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने सोमवारी चित्रपट,वाहिन्यांवरील मालिका यांचे चित्रीकरण सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केले आहे.(MNS's Ameya Khopkar says; Don't stop Film shooting)

Ameya Khopkar
तळजाई जैववैविधता प्रकल्पाला मनसेचा विरोध; ठाकरे उतरणार मैदानात

लॉकडाऊनच्या काळात चित्रपट,नाटक व संबंधित तंत्रज्ञ, कामगार यांनी बंदमुळे बरंच भोगलंय.आता पुन्हा एक दिवस काम बंद ठेवलं तर आर्थिक नुकसान सोसावं लागेल. म्हणूनच पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये चित्रीकरण थांबवू नयेत ही तमाम चित्रपट इंडस्ट्रीतर्फे आम्ही मागणी करत आहोत. शासनाने या क्षेत्राचा गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन खोपकर यांनी केले आहे.

Ameya Khopkar
सीबीआय-इन्कमटॅक्स या संस्था भाजपाचे नेते चालवताहेत

मराठी-हिंदी चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण राज्याच्या विविध भागात सुरू असते. या चित्रीकरणाचे वेळापत्रक खूप आधीपासून केलेले असते. अनेक कलाकरांच्या तारखा ठरलेल्या असतात. अशाप्रकारे अचानक बंद ठेवला तर या साऱ्यांचे वेळापत्रक बिघडते. त्यातून अनेकांचे नुकसान होते. गेल्या दीड वर्षात चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांचे पोट हातावर आहे, अशा शेकडो कलाकारांचे या काळात मोठ अर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे आणखी नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने विचार करावा, असे खोपकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.