राज ठाकरेंचं पुण्यात शाही स्वागत! शंभर पुरोहितांचं मंत्रपठण अन् फुलांचा वर्षाव

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुण्यात आगमन
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिसांकडून अखेर परवानगी मिळाली आहे. या सभेमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सभेसाठी निघालेल्या राज ठाकरेंच्या पुण्यात आगमन झाले असून, त्यांचे शाही स्वागत करण्यात आले.

राज ठाकरेंचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या गाड्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच, शंभर पुरोहितांकडून मंत्रपठण करण्यात आले. राज ठाकरेंना पुढील कार्यात यश लाभो, यासाठी पुरोहितांकडून पूजाही करण्यात आली. यानंतर राज ठाकरे हे वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी रवाना झाले आहेत. तिथे दर्शन घेऊन ते पुढे रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेंगडे, मिलिंद एकबोटे हे आहेत. वढू येथे मनसे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

Raj Thackeray
राज ठाकरेंचं पुण्यात जंगी स्वागत पण वसंत मोरे कुठेच दिसेनात!

राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या सभेसाठी सुमारे अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. दरम्यान, परवानगी मिळाली नाही तरी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांनी देखील संघर्ष टाळत संयमाची भूमिका घेतली आहे. मनसे नेत्यांच्या आधी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठकही पार पडली होती.

Raj Thackeray
मेवानींची अटक भाजपला महागात! सत्र न्यायालयानंच केली थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

राज ठाकरे यांची सभा 1 मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी होत आहे. 3 मे रोजी रमजान सण असल्याने या सभेतून कुठल्याही प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले जाऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. सभेला काही कडक अटी-शर्ती घालूनच परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी कुठलाही अनुचित प्रकार सभेदरम्यान किंवा त्यानंतर घडू नये, यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. या सभेच्या बंदोबस्तासाठी 8 पोलीस उपायुक्तांसह अन्य अधिकारी व दोन हजार पोलीस कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com