मनसेने आपला २२ धावांवर रोखले; अजय शिंदे अन् साईनाथ बाबर यांची जोरदार गोलंदाजी

मनसे (MNS) आणि आपमध्ये रंगला जोरदार सामना
मनसेने आपला २२ धावांवर रोखले; अजय शिंदे अन् साईनाथ बाबर यांची जोरदार गोलंदाजी
MNSsarkarnama

पुणे : राजकीय मैदानात जोरदार गोलंदाजी-फलंदाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांची शनिवारी सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेत प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानातली कामगिरीही जोरदारपणे रंगली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp), महसूल, पोलिस प्रशासन अशा सर्वच पक्षांच्या टीमने मैदानावरही जोरदार फटकेबाजी केली.

आज रविवारी क्रिकेटनामा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिला लीग सामना मनसे (MNS) विरुद्ध आम आदमी पक्ष असा रंगला. गजानन काळे यांच्या नेतृत्वात मनसेची टीम मैदानात उतरली. यात शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे असे दिग्गज खेळाडू मैदानात उतरले.

MNS
Cricketnama : मुंडे अन् तटकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने उडवला काँग्रेसचा धुव्वा

तर शैलेश मोहिते यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या टीममध्ये मोहनिश येंदे, सरफराज शेख, गोवर्धन गोसावी, समीर आरवाडे, गणेश थरकुडे, विजय भुमकर, स्वप्निल गांगुरडे अशा खेळाडूंचा समावेश आहे. मनसेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. मनसेने आपची पहिली विकेट दुसऱ्याच चेंडूवर काढली. स्वप्निल गांगुरडे एका धावेवर धावबाद झाले. आम आदमीची सुरुवात खराब झाली.

MNS
Cricketnama : शिवसेनेने भाजपला चारली धूळ; मिलिंद नार्वेकरांना उचलून घेत जल्लोष

शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची जबरदस्त गोलंदाजी. सरफरजा शेख बाद. महाराष्ट्रन नवनिर्माण सेनेला फक्त २२ धावांची गरज आहे. मनसे आता मैदानात उतरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in