Kasaba By-Election : कसब्याची निवडणूक होणार रंगतदार ; शिवसेनेपाठोपाठ मनसेही रिंगणात..

MNS News : ३ फेब्रुवारी रोजी मनसे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.
Kasaba by-election, MNS News
Kasaba by-election, MNS Newssarkarnama

Kasaba by-election News: राज्यात सध्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली आहे. निवडणूक लढविण्यासाठी गरज असलेल्या विविध ‘ना हरकत’ दाखल्यांसाठी (एनओसी) महापालिकेकडे अनेकांनी अर्ज केले आहेत.कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या दोन्ही पक्षांचे नेते काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामध्ये कसबा पेठ मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही भूमिका घेईल.

Kasaba by-election, MNS News
Bihar Politics: 'मरण आले तरी चालेल पण, मी भाजपमध्ये..'; नितीश कुमार यांचे मोठं विधान

पुण्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेतेही त्याला अनुकूल भूमिका घेतील, असे सध्याचे चित्र आहे.अशातच शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संजय मोरे यांच्यासह उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविका असे ४ ते ५ जण निवडणुक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

या पाठोपाठ आता मनसेने देखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. कसबा पेठेत आणि परिसरातील असणाऱ्या मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची याबाबत नुकतीच बैठक झाली.या बैठकीत 'कसबा पेठ मनसे लढवू शकते,' असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे.

इच्छुकांची नावे अणि पदाधिकारी यांची भूमिका मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या मार्फत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे जाणार आहे. त्यानंतर पक्ष प्रमुख राज ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी मनसे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू आहे.

Kasaba by-election, MNS News
Kasaba By-Election : कसबा विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर? आघाडीत बिघाडीची शक्यता...

मुक्ता टिळक त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश किंवा मुलगा कुणाल यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकेल. त्यांच्याऐवजी अन्य उमेदवाराची निवड करण्याचे ठरल्यास, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी नगरसेवक राजेश येनपुरे या इच्छुकांतून एकाची निवड पक्षातर्फे होऊ शकेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com