महापौर साहेब आपण इंग्रज होऊ नका...मनसेने दिली हाक!

आपण इंग्रज नाही आणि पुण्यातील परिस्थिती तत्कालीन प्लेगच्या रोगा सारखी नाही, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्याच्या महापौरांना आव्हान दिले आहे. विसर्जनावर आणलेली अघोषित बंदी आम्ही मानणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे
MNS Pune Writes letter to Mayor for Ganesh Festival
MNS Pune Writes letter to Mayor for Ganesh Festival

पुणे : प्लेगच्या काळात ब्रिटिशांनी बंधने लादली होती. १८९७ मध्ये आलेल्या या साथीत प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. या शोध मोहिमेत घरातील देव्हार्‍या पर्यन्त इंग्रज जाऊ लागले आणि इंग्रजांविरूद्धात असंतोष पसरू लागला. आपण इंग्रज नाही आणि पुण्यातील परिस्थिती तत्कालीन प्लेगच्या रोगा सारखी नाही, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्याच्या महापौरांना आव्हान दिले आहे. विसर्जनावर आणलेली अघोषित बंदी आम्ही मानणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. तुम्ही आहात  कोण  हिंदूच्या धार्मिक बाबी मध्ये हस्तक्षेप करणारे ?आणि ती ही गरज नसताना, असा सवालही मनसेने महापौरांना विचारला आहे. 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव कसा साजरा करावा याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत. या वादात आता मनसे उतरली आहे. "जगावर करोना संकट आहे तसच ते देशावर ही आहे आणि महाराष्ट्रावर ही आहे.पण महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात तो  फक्त देवदेवतांच्या मागे लागला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे मनपाच्या निर्णया वरून वाटत आहे. काल परवा आपण पुणेकरांना गणपतीमूर्तीचा आकार ठरवून देत गणेशाच्या मुर्ती घरातच विसर्जीत करायचं बंधन घातले किंवा त्या घरातच ठेवा असं ही सांगितले इंग्रजांच्या काळात ही अशीच बंधन घालण्यात येत होती,'' असे मनसेने महापौरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सार्वजनिक मंडळांनी मूर्ती ठेवायच्या कुठे?

''सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नका हे अहवाहन पुणेकरांनी स्वीकारलं. गणेश मूर्ती देवळातच बसवण्याची तयारी ही सुरू झाली त्यात ही खरतर काही ठिकाणी अडचणी आहेत अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्ती ना देवळं नाही त्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न आहेच. चंद्रकांत दादा पाटील यांनी  देखील या संदर्भातील मागणी केली आहे. आणि अशा परिस्थितीत मांडवाची मागणी रास्त आहे," असा दावा मनसेने केला आहे. 

घरच्या गणपतींवर बंधने का?

''आता प्रश्न गणेश विसर्जनाचा तर गणेश विसर्जनाला या वर्षी तरी कोणी मिरवणुका काढणार नाही घरगुती गणपतीच विसर्जन हे प्रत्येक घरातील जास्तीत जास्त ४ मंडळी कडून होत आणि सगळ्याच घरातील गणपती एकाच दिवशी आणि एकच वेळी विसर्जित होत नाहीत. आपल्या कडे एकाच दिवशी संपूर्ण शहराचे गणपती विसर्जित होतात अशी माहिती असल्यास ती द्यावी , आणि ते एकाच ठिकाणी होते असं ही नाही  पुण्यातील प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयातील हद्दीत हे विसर्जन होते. या प्रत्येक विसर्जन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची आणि गर्दी मुळे पोलिसी कारवाई झाल्याची नोंद ही कुठेच नाही. मग घरीच विसर्जन करा  आणि गणेश मूर्ती २ फुटाच्या आतल्या अशी बंधन का?,'' असा सवाल मनसेने महापौरांना विचारला आहे. 

''आणि महापौर साहेब बंधन घालता आणि घाटावर विद्युत रोषणाई करता दोन अडीच कोटींची टेंडर कशा साठी काढता हे टेंडर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालया साठी आहे मग नक्की साधायच काय आहे ? मनपा विद्युत विभागाचे टेंडर काढणार आपण जनतेवर बंधन घालनार आणि स्थायी समिती केमिकल खरेदी करणार,  हे नक्की काय आहे आणि  कोणा साठी याची  शहरात चर्चा आहे. मध्यवस्तीतील एका विद्यमान लोकप्रतिनिधी च्या नातेवाईका साठी हा खटाटोप गेल्या 3 वर्षा पासून सुरू आहे," असाही आरोप मनसेने केला आहे.

सदर बाबत आपण योग्य त्या उपाययोजना सुचवा, सोशल डिस्टन्सं बंधनकारक करा , दरवर्षी प्रमाणे  मनपा सेवकां च्या माध्यमातून विसर्जन योजना राबवा. अगदी गरज असेल तर आम्हाला ही सहभागी करून घ्या. पण  आपण योग्य तो निर्णय घ्यावा, अस आवाहन मनसेने पत्रात शेवटी केले आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com