औरंगाबादनंतर आता पुण्यात 'राज'सभा? कार्यकर्ते लागले कामाला

राज ठाकरे (Raj Thackeray) मंगळवारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama

पुणे : राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विविध पक्षाचे नेते राज्यात जाहीर सभा घेऊन एकमेकांवर टीकेचा भडिमार करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या सभेनंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. त्याच बरोबर अनेकांना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान, राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली आहे. (Raj Thackeray Latest News)

या संदर्भात पुणे मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली, असल्याचे पत्र व्हायरल होत आहे. या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आज संध्याकाळी राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये बैठकीमध्ये सभेसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच राज ठाकरे मंगळवारी दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

Raj Thackeray
राष्ट्रवादीबाबत पटोलेंची सोनिया गांधींकडे तक्रार... अजितदादा म्हणतात, ‘फार महत्व द्यायचं कारण नाही!’

व्हायरल होत असलेल्या पत्रामध्ये, 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी बाबर यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात ही सभा होणार असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सूचनेनुसार आम्ही सभेसाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे मैदान निवडले असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे.

Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्त मुंबईमध्ये सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टिका केली होती. त्यानंतर त्यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली होती. ठाण्यातील सभेनंतर त्यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. या सभांमध्ये राज ठाकरे यांनी आक्रमक पणे हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. राज यांच्या सभेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याही सभा झाल्या.

Raj Thackeray
आधी शहराध्यक्षपद काढलं अन् आता..! 'मनसे'चा वसंत मोरेंना पुन्हा धक्का

उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी झालेल्या मास्ट सभेमध्ये राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यातच आता राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या (BJP) उत्तर प्रदेशातील खासदाराने विरोध केली आहे. तसेच पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्रमक पणे पत्र लिहिले होते. या सर्वच मुद्यांवर ते पुण्यातील सभेत भूमिका मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com