तळजाई जैववैविधता प्रकल्पाला मनसेचा विरोध; ठाकरे उतरणार मैदानात

महापालिका प्रशासनाने हा प्रकल्प मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे. लवकरच यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
तळजाई जैववैविधता प्रकल्पाला मनसेचा विरोध; ठाकरे उतरणार मैदानात
राज ठाकरे सरकारनामा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यात तळजाई टेकडीवर १०७ एकराच्या विस्तीर्ण परिसरात होणाऱ्या नियोजित जैववैविधता वसुंधरा प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला असून या विरोधात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे या भागातील मूळ नैसर्गिक जैववैविधतेला धोका पोचण्याची भीती असून हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्णय पक्षाच्यावतीने घेण्यात आला आहे. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी येत्या २४ ऑक्टोबरला सकाळी सात वाजता होणाऱ्या आंदोलनाला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: उपस्थित राहणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक वंसत मोरे यांनी सांगितले.

 राज ठाकरे
सीबीआय-इन्कमटॅक्स या संस्था भाजपाचे नेते चालवताहेत

महापालिका प्रशासनाने हा प्रकल्प मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे. लवकरच यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, तळजाई बचाव समितीने या प्रकल्पाला यापूर्वीच विरोध केला आहे. हा प्रकल्प म्हणजे सुधारणांच्या नावाखाली तळजाई डोंगरावर एकप्रकारचे अतिक्रमण आहे.

येत्या सहा महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याकडे गेल्या सहा महिन्यात राज ठाकरे यांनी विशेष लक्ष दिले आहे.पुण्यातील कार्यकर्त्यांना अधिक सक्रीय करून महापालिका निवडणूक अधिक ताकदीने लढण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. तळजाई टेकडीवरील आंदोलन हा त्या योजनेचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

 राज ठाकरे
मोहन जोशींनी केला भाजपाच्या अपयशाचा पंचनामा

गेल्या सहा महिन्यात राज ठाकरे यांनी पुण्यात विशेष लक्ष घातले असून तीन महिन्यात तब्बल आठवेळा पुण्याचा दौरा केला आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर ठाकरे यांना पुणे आणि नाशिक या दोन शहरांनी विशेष प्रतिसाद दिला होता. पुण्यात पहिल्याच निवडणुकीत तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. नाशिकमध्ये महापालिकेची सत्ता मिळाली होती. त्यामुळे या दोन शहरांवर ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in