Vasant More : मशिदीवरील भोंग्यावरून राज ठाकरेंचा पुन्हा इशारा; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं...

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत.
Vasant More and Raj Thackeray
Vasant More and Raj ThackeraySarkarnama

Pune MNS : गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न मांडला. अजूनही भोंग्याचा विषय संपलेला नाही. राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती त्यांनी केली. एकतर सरकारने लाउडस्पीकर बंद करावेत, अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाउडस्पीकर बंद करतो, असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यानंतर आता मनसे नेते वसंत मोरे यांनीही मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी आज हजेरी लावली. मात्र, त्याआधी वसंत मोरे यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नासंदर्भात आपली भूमिका स्पष्टच सांगितली.

Vasant More and Raj Thackeray
Supreme Court : न्यायपालिकेबरोबर मतभेत म्हणजे संघर्ष नाही; केंद्रीय कायदा मंत्र्यांचा सूर मवाळ

वसंत मोरे म्हणाले, ''राज ठाकरे यांनी सरकारला मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नासंदर्भात अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेतं ते पाहू. माझ्या भागातील भोंग्याचा विषय पहिल्यासारखाच आहे. माझ्या भागात कुठल्याही भोंग्याचा आवाज वाढलेला नाही. त्यामुळे माझी पहिल्यापासून समंजसपणाची भूमिका आहे. मात्र, या विषयावर आता सरकार काय निर्णय घेतं? त्याकडे लक्ष लागले आहे'', असं मोरे यावेळी म्हणाले.

Vasant More and Raj Thackeray
Ambadas Danve News : भुमरे समर्थकांकडून `सामना`ची होळी, दानवे म्हणाले, थोडी तरी लाज वाटू द्या..

दरम्यान, राज ठाकरे हे पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. या प्रकल्पादरम्यान सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याच्या कारणामुळे याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात राज ठाकरेंना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे आता राज ठाकरे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com