राज ठाकरेंच्या दौऱ्यात कुठंच न दिसलेले वसंत मोरे अखेर प्रकटले अन् म्हणाले...

मशिदीवरील भोंग्याबाबतच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला वसंत मोरेंचा होता विरोध
Raj Thackeray and Vasant More
Raj Thackeray and Vasant More Sarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे पुण्यात आले होते. पुण्यात शंभर पुरोहितांकडूम मंत्रपठण आणि गाड्यांवर फुलांचा वर्षाव असं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण यात मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे कुठेच न दिसल्याने चर्चांना उधाण आले होतं. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, मोरे हे अखेर प्रकटले आहेत.

राज ठाकरेंच्या मुंबई आणि ठाण्यातील सभांना हजेरी लावणारे वसंत मोरे मात्र त्यांच्या पुणे दौऱ्यात गायब असल्याची चर्चा सुरू होती. त्यांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा राजकीय चर्चा रंगली होती. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहरातील सर्व पदाधिकारी हजर असतात. या वेळी औरंगाबादला जाण्यापूर्वीही ठाकरे पुण्यात आले आहेत. या दौऱ्यात शंभर पुरोहितांकडून मंत्रपठण आणि काही धार्मिक विधी झाले आहेत. मात्र, राज ठाकरे आल्यापासून वसंत मोरे हे कुणालाही दिसलेले नव्हते. यानंतर मोठी चर्चा सुरू झाल्यानंतर मोरे प्रकटले आहेत. ते थेट वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाथीस्थळी पोचले.

Raj Thackeray and Vasant More
राज ठाकरे पुण्यात अन् मनसेचे नेते वसंत मोरे इफ्तार पार्टीत!

मनसेच्या काही नेत्यांकडून मोरे हे आजारी असल्याचे सांगितले जात होत. वढू येथे पोचल्यानंतरचा व्हिडीओही वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्यांच्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या राजकीय विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी एकदम ठणठणीत आहे. माझ्या तब्येतीची काळजी करणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण बाहेर ऊन खूप आहे ते सहन होणार नाही. मी उद्या श्री.छत्रपती संभाजी महाराज नगरला येतोय...!

Raj Thackeray and Vasant More
विश्वजीत कदमांचे सासरे अडचणीत! ईडीनंतर आता अडकले सीबीआयच्या फेऱ्यात

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर मोरेंनी त्यांच्या प्रभागातील मशिदींमसोर भोंगे लावणार नाही,अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे मोरे आता मनसेतून बाहेर पडतील, अशीही शक्यता वर्तविली जात होती. मात्र, यानंतर मोरेंनी शिवतीर्थवर जाऊन राज यांची भेट घेतली आणि आपण शंभर टक्के समाधानी झाल्याचे सांगितले होते. यानंतर या सगळ्या वादावर पडदा पडला होता.त्यानंतर झालेल्या ठाण्याच्या सभेचं निमंत्रण राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिलं होतं. या सभेत वसंत मोरेंनाही सर्वांत आधी भाषण करण्याची संधी मिळाली होती.

मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन दूर केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची पुण्यातील त्यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि इतर काही पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सुरवातीला शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर ते राज ठाकरेंना भेटले. मोरे हे मनसे सोडून इतर पक्षात जातील, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल या भेटीनंतर विचारताच मोरेंनी सगळ्या ऑफर संपल्याचे सांगितले. यामुळे ते मनसेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com