"मला प्रभागात शांतता हवी आहे" : राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यास वसंत मोरेंचा नकार

Raj Thackeray | Vasant More | Pune | MNS : "मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा"
Vasant More
Vasant Moresarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीच्या समोरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, अशा भूमिकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होवून या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमधील (Mumbai) चांदिवली, कुर्ला आणि अन्य भागात मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली आहे. तर काही ठिकाणी भोंगे लावण्याचा प्रयत्न करत असलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

मात्र राज ठाकरे यांचा हा आदेश त्यांच्याच कट्टर समर्थकाने धुडकावून लावला आहे. मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या या आदेशाचे पुण्यात पालन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात मला शांतता हवी आहे. म्हणून असे कोणतेही पाऊल उचलणार नाही. काही अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

Vasant More
"शिवसेनेचे १४ खासदार भाजपच्या संपर्कात" : दिल्लीतील बैठकीनंतर बड्या नेत्याचा बॉम्ब

राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात. मात्र त्यांना राजसाहेबांचे भाषणचं कळले नाही. “राज ठाकरेंनी जो शब्द वापरला तो, ‘जर मशीदींवरील भोंगे काढले नाही तर..’ असा होता. मी स्टेजवर होतो, मी भाषण ऐकले आहे. तर भोंगे कोणी काढायचे आहेत? सरकारने भोंगे काढायचेत. सरकारने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी,” असे मोरे यांनी म्हटले आहे. तसेच आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Vasant More
मुस्लिम मनसैनिक नाराज; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर पक्षात राजीनामा सत्राला सुरुवात

मुस्लिम मनसैनिक नाराज :

दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मुस्लिम मनसैनिक नाराज झाले असून त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ चे शाखाध्यक्ष माजीद अमीन शेख यांनी पत्र लिहुन राजीनामा दिला आहे. तर कल्याणमधील मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांच्यासह अनेक मुस्लिम मनसैनिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत. इरफान शेख यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त "आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या, आज समाजाला सामोरे जाताना जाणिव झाली. १६ वर्षांचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं" अशी भावनिक पोस्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com