राज ठाकरेंचं पुण्यात जंगी स्वागत पण वसंत मोरे कुठेच दिसेनात!

मशिदीवरील भोंग्याबाबतच्या राज ठाकरेंच्या भूमिकेला वसंत मोरेंचा होता विरोध
राज ठाकरेंचं पुण्यात जंगी स्वागत पण वसंत मोरे कुठेच दिसेनात!
Raj Thackeray and Vasant More Sarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. पुण्यात शंभर पुरोहितांकडूम मंत्रपठण आणि गाड्यांवर फुलांचा वर्षाव असं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण यात मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे कुठेच न दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरेंच्या मुंबई आणि ठाण्यातील सभांना हजेरी लावणारे वसंत मोरे मात्र त्यांच्या पुणे दौऱ्यात गायब आहेत. त्यांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा राजकीय चर्चा रंगली आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहरातील सर्व पदाधिकारी हजर असतात. पुण्यातील राजमहाल इमारतीत ठाकरे वास्तव्यास असतात. औरंगाबादला जाण्यापूर्वीही ठाकरे पुण्यात आले आहेत. या दौऱ्यात शंभर पुरोहितांकडून मंत्रपठण आणि काही धार्मिक विधी झाले आहेत. मात्र, राज ठाकरे आल्यापासून वसंत मोरे हे कुणालाही दिसलेले नाहीत. दरम्यान, मोरे हे २ दिवसांपासून आजारी असून, ते थेट औरंगाबादमधील सभेला उपस्थित राहणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

Raj Thackeray and Vasant More
मेवानींची अटक भाजपला महागात! सत्र न्यायालयानंच केली थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर मोरेंनी त्यांच्या प्रभागातील मशिदींमसोर भोंगे लावणार नाही,अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे मोरे आता मनसेतून बाहेर पडतील, अशीही शक्यता वर्तविली जात होती. मात्र, यानंतर मोरेंनी शिवतीर्थवर जाऊन राज यांची भेट घेतली आणि आपण शंभर टक्के समाधानी झाल्याचे सांगितले होते. यानंतर या सगळ्या वादावर पडदा पडला होता.त्यानंतर झालेल्या ठाण्याच्या सभेचं निमंत्रण राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिलं होतं. या सभेत वसंत मोरेंनाही सर्वांत आधी भाषण करण्याची संधी मिळाली होती.

Raj Thackeray and Vasant More
हे तर पोलिसाचं राज्य! आमदाराच्या अटकेवरून न्यायालयानं सरकारला झापलं

मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरुन दूर केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची पुण्यातील त्यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि इतर काही पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सुरवातीला शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी काही काळ चर्चा केल्यानंतर ते राज ठाकरेंना भेटले. मोरे हे मनसे सोडून इतर पक्षात जातील, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल या भेटीनंतर विचारताच मोरेंनी सगळ्या ऑफर संपल्याचे सांगितले. यामुळे ते मनसेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.