चर्चांना उधाण! महाआरतीनंतर आता मनसेच्या वसंत मोरेंची ईदच्या मेजवानीला हजेरी

महाआरतीनंतर वसंत मोरेंनी केली ईद साजरी
Vasant More
Vasant More Sarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात मनसेचे माजी पुणे शहर शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) कुठेच दिसले नव्हते. मात्र, अखेर वसंत मोरे यांनी शनिवारी कात्रज गावठाण येथील हनुमान मंदिरात महाआरती आयोजित केली होती. यानंतर आता वसंत मोरेंनी ईद साजरी करून सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ईद साजरी केल्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. मनसेच्या मुस्लिम पदाधिकऱ्याच्या घरी जाऊन ते मेजवानीत सहभागी झाले होते. मनसेचे वाहतूक सेनेने शहर सरचिटणीस आवेज भाई शेख यांच्या घरी ही मेजवानी झाली. याबाबत मोरेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेजभाई शेख यांचे घरी जेवण केले. सोबत सुनील अंधारे (पाटील) पुणे शहर वाहतूक उपाध्यक्ष, शाखा अध्यक्ष अमितआण्णा जगताप, शाखा अध्यक्ष मंगेश रासकर होते. परिसरातील बरेच नागरिकही उपस्थित होते.

Vasant More
मोठी बातमी : भारतातील मुस्लिमांची संख्या वाढत नसून घटतेय!

दरम्यान, राज ठाकरे हे शनिवारी (ता.7) पुणे दौऱ्यावर होते. असे असताना ते मोरे यांच्या महाआरतीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर काल (ता.8) वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थान असलेल्या राजमहाल याठिकाणी ही भेट झाली होती.

Vasant More
भाजप नेत्यानं आमदारकीवर पाणी सोडलं अन् मुख्यमंत्री पुन्हा विधानसभेच्या रिंगणात

या भेटीनंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. मोरे म्हणाले होते की, राजसाहेब काल पुण्यात येणार असल्याचे मला माहीत नव्हते. प्रसारमाध्यमांमुळेच साहेब पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यापूर्वीच मी महाआरतीचे आयोजन केले होते. त्याबद्दल राज ठाकरे यांना मेसेज करून कळवले होते. महाआरतीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. महाआरतीनंतर आज राज साहेबांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com