महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची! वसंत मोरेंनी घातली साद

प्रचंड शरीर संपत्ती लाभलेले उमेश हे गेल्या २ वर्षांपासून आजाराशी झुंज देत आहेत.
Umesh Vasave Latest Marathi News
Umesh Vasave Latest Marathi NewsSarkarnama

पुणे : महाराष्ट्रातील मनसेचे पहिले आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे अंगरक्षक उमेश वसवे यांच्या मदतीसाठी पक्षाचे नेते वसंत मोरे धावून आले आहेत. प्रचंड शरीर संपत्ती लाभलेले उमेश हे गेल्या २ वर्षांपासून आजाराशी झुंज देत आहेत. त्यासाठी मोरे यांनी मदतीचे आवाहन केलं आहे. (Umesh Vasave Latest Marathi News)

वसंत मोरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून उमेश वसवे यांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी वसवे यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वांजळे तसेच आपल्यासोबची छायाचित्रेही शेअर केली आहेत. वसवे हे सिंहगड परिसरातील वसवेवाडी याठिकाणी राहतात. त्यांचे वय अवघे 40 वर्षे असून उंची सात फूट तर वजन 165 किलो एवढे आहे. (MNS leader Vasant More appeals for help to Umesh Vasave)

Umesh Vasave Latest Marathi News
थेट हॉटेल गाठत आमदार संजय शिंदेंनी केले पत्ते खुले! व्हिडीओ आला समोर

काय म्हटलंय वसंत मोरेंनी?

अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेला उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराने व्यापलाय. होतं नव्हतं ते सगळे जगण्याच्या धडपडीत गमावून बसलाय. लोकांना सुरक्षा देणारा खली आज जगण्यासाठी ढसाढसा रडताना पाहिलाय. पुण्यातील एका नामांकित बिल्डरने त्याचे कष्टाचे पैसे बुडवलेत. मी त्या बिल्डरला फोन केला तर पैसे नाहीत बोलला. ठीक आहे त्याला थोडा सवडीने बघतो, असं मोरे यांनी म्हटलं आहे.

मित्रांनो, हा उमेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे. जर त्याने या महिन्यात त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया केली नाही तर कदाचित ही आपली मराठी माणसाची संपत्ती मातीत मिळेल. त्याचे नाशिकला ऑपरेशन करायचे आहे, असं मोरे यांनी सांगितलं.

तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, उमेश ला जमेल तशी यथाशक्ती मदत करा, असं आवाहन मोरे यांनी केलं आहे. तुमचे १०० ते ५०० रुपये सुद्धा हा धिप्पाड मराठी देह वाचवू शकतात. कारण ही असली माणसं परत परत जन्म घेत नाही. तेव्हा प्लीज मदत करा, असं आवाहन मोरे यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com