मनसे नेत्याच्या मुलाला धमकी ; इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे!

रुपेश मोरे (Rupesh More) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हे ठेवली होती. ही घटना ती दिवसापूर्वी घडली आहे.
मनसे नेत्याच्या मुलाला धमकी ; इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे!
Rupesh More News, Vasant More latest Marathi newssarkarnama

पुणे : पुण्यातील मनसेचे नेते, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मशिदीवरील बेकायदा भोंगे खाली उतरविण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करणारे वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या मुलगा रुपेश याला धमकी मिळाल्याने चर्चा रंगली आहे. (Vasant More latest Marathi news)

"सावध राहा रुपेश" अशा आशयाची चिठ्ठी वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हे ठेवली होती. ही घटना ती दिवसापूर्वी घडली आहे. याबाबत वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

Rupesh More News, Vasant More latest Marathi news
नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका ; नोटीस योग्यच

वसंत मोरे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात..

मुलगा म्हटलं की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो...

आमचेही अगदी तसंच आहे,

पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही...

राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही...

गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते,

पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे...

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली,

त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये

"सावध रहा रुपेश"

अशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली...

तसा तो कोणाच्या अध्यात मध्यात नसतो तरीही असे का ?

हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय...

आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?

हे का तेच कळत नाही...

भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत...

तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय...

बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप

वसंत ( तात्या ) मोरे आहे...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in