अमित ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर; १३ मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या घेणार भेटी

Amit Thackeray : कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत.
Amit Thackeray Latest News
Amit Thackeray Latest News sarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackrey) यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता ते कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. (Amit Thackeray Latest News)

Amit Thackeray Latest News
Chitra Wagh : नितीशकुमार ज्या मार्गावर चाललेत त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात...

अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाची सुरूवात केली असून त्यांनी राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता ते तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान ठाकरे हे पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यामध्ये ते महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. तसेच ठाकरे हे या दौऱ्यादरम्यान सर्व मतदार संघात जाऊन पक्ष बांधिलकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

अमित हे पुण्यातील ८ आणि शिरूर मधील ५ मतदारसंघात जाऊन तिथल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. १२ ऑगस्टला अमित हे कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी करणार दौरा करणार असून १३ तारखेला पर्वती, हडपसर, पुरंदर,, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघाचा दौरा करणार आणि १४ ऑगस्टला अमित ठाकरेंता शिरूर, चाकण आणि खेड मध्ये दौरा असणार आहे.

Amit Thackeray Latest News
मंंत्रीपदाची शपथ घेतानाच मंत्र्यांना बाळासाहेबांचा पडला विसर: पेडणेकरांची टीका

दरम्यान, आगामी महापालिका निवडणूका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या तब्येतीमुळे त्यांना मर्यादा येत आहेत. मात्र अमित ठाकरे हे पक्षाच्या पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षबांधणी मजबूत करतांना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in