Kasba By-Election : रासनेंच्या विजयासाठी मनसे शेवटच्या क्षणी मैदानात; सक्रिय होण्याचे राज ठाकरेंचे आदेश!

Pune MNS : बाळा नांदगावकर दोन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून...
BJP and MNS
BJP and MNS Sarkarnama

Kasba By-Election : हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री दिले.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. आता मतदान होईपर्यंत ते पुण्यातच थांबणार आहेत. पुढच्या दोन दिवसात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतदानासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर काम करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार पक्षाचा प्रत्येक सैनिक भाजपाचे उमेदवार रासने यांच्यासाठी काम करणार आहे, असे नांदगावकर यांनी सांगितले.

BJP and MNS
Pune : प्रतापगडाचा प्रश्न सोडवला तसा पुण्येश्वराचाही सोडवू, त्यासाठी रासनेंना निवडून द्या; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

शुक्रवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा या संदर्भातील आदेश सर्व मनसैनिकांना देण्यात आले आहेत. वास्तविक या निवडणुकीत मनसे थेट निवडणुकीच्या प्रचारात उतरणार नव्हती. केवळ भाजपला पाठिंबा देणार होती. त्यानुसार आज प्रचाराची सांगता झाली. प्रचारात मनसे कुठेही सक्रिय नव्हती. मात्र, यानंतर मनसेच्यावतीने भाजपासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

BJP and MNS
Kasba By election : धंगेकरांचा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप; शनिवारी सकाळी उपोषणाला बसणार

या मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत शिंदे यांना सुमारे साडेआठ हजार मते मिळाली होती. त्यानंतर मनसेत रूपाली ठोंबरे पाटील यांच्या रूपाने फूट पडली आहे.

मनसेची ताकद काहीशी कमी झाली असली तरी मनसेला मानणारा तरुण वर्ग मोठ्या संख्येने पक्षात आजही आहे. त्यामुळे मनसेच्या या सक्रियतेचा भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना फायदा होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in